छत्रपतींच्या पुतळ्यावरील वादावर मुख्यमंत्र्याचं धक्कादायक विधान

0

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर धक्कादायक विधान केलंय. विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं विधान बोम्मई यांनी केल्यानं आता शिवप्रेमी अधिकच संपातले आहेत. महाराष्ट्रभरातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे.

 काय म्हणाले बोम्मई?

रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीनं जे केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेलं, तर कारवाई ही होणारचं. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केलं जाणार नाही.

नेमकं वादाचं मूळ काय?

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल  झाला होता. विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती. बंगळुरुतील एक चौकातील हा पुतळा असून, त्याची गुरुवारी रात्री विटंबना करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या घटनेचा व्हिडीओ तयार करुन तो सोशल मीडियावर  पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर ही घटना समोर आली आणि चौफेर या घटनेबाबत तीव्र पडसाद उमटू लागले.

यामुळे वाद चिघळणार?

या वादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत, छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, अशा अर्थाचं विधान केल्यानं हा वाद आता आणखी ताणला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान कर्नाटकातील पोलिसांना या संपूर्ण घटनेप्रकरणी कायद्याचं उल्लंघन करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्याचप्रमाणे गृहमंत्र्यांना या घटनेकडे लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत.

बंगळुरुतील या घटनेचा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून निषेध केला जातोय. या घटनेच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये कर्नाटकातील गाडी खासगी गाड्यंची तोडफोड केली आहे. तर तिकडे बेळगावातही शिवप्रेमींची अडवणूक करण्यात आली आहे. शिवाजी गार्डन इथं छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या शिवप्रेमींनी कर्नाटक पोलिसांनी रोखलं होतं. या तणावाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम बेळगावात लागू करण्यात आलं असून मोठा पोलीस फौजफाटाही या भागात पाहायला मिळतोय.

युवराजांनी नोंदवला निषेध

बंगळुरू येथील घटनेचा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी कडक शब्दांत निषेध नोंदवलाय. दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी!

 

Leave A Reply

Your email address will not be published.