अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयिताचा जामीन फेटाळला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपीने जामिनासाठी शुक्रवारी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर कामकाज होवून न्यायालयाने सुनावणीअंती जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा विनोद मधुकर लोंढे याने कचरा फेकण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजता घडली होती. दिवसभर मुलीला डांबून ठेवल्यानंतर सायंकाळी तिला तिच्या घराजवळ सोडून दिले होते. मुलीने ही संपूर्ण घटना आईला सांगितली होती.

पीडितेच्या आईने लागलीच रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्यानुसार विनोद लोंढे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

दरम्यान, जामीन मिळावा यासाठी त्याने शुक्रवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला. त्यावर कामकाज होवून न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड़ सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.