चोपडा बाजार समितीत शुकशुकाट

0

शासनाच्या सेवेत समावेश करून घेण्यासाठी बाजार समिती कर्मचारयाचे बेमुदत आंदोलन

प्रतिनिधी चोपडा
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या कर्मचार्यांनी देखील आजपासून बेमुदत आंदोलन केले असून कोणतेही कर्मचारी कामावर न आल्याने एकच शांतता कार्यलयात दिसून आली.
चोपडा बाजार समितीत सचिव व अन्य 18 कर्मचार्‍यानी राज्यभरात सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी झाल्याने चोपडा बाजार समितीत शेतकर्‍यांनी कोणत्याच प्रकारचा माल विक्री ला आणला नसल्याने एकच शांतता दिसून येत होती.
दुपारी केळी उत्पादक शेतकर्‍यांची समस्या सोडविताना बाजार समिती सभापती जगन्नाथ पाटील हे एकटे बसलेले होते.यावेळी संचालक नितीन पाटील उपस्थित होते.एका केळी व्यापार्‍यांनी कुरवेल येथील शेतकर्‍यांचा केळी कापून पैसे दिले नसून त्याने धनादेश दिले असून ते बँकेत टाका आणि धनादेश अनादर झाला की त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करा असे मार्गदर्शन यावेळी सभापती पाटील यांनी केले होते.
कर्मचारी काम बंद संपामुळे एकच शुकशुकाट बाजार समिती मध्ये दिसून आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.