भुसावळच्या 11 संशयितांची टाडा खटल्यातुन 25 वर्षानंतर निर्दोष मुक्तता

0

भुसावळ दि . 28-
येथील मुस्लिम बांधवांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून सन 1994 मध्ये 11 संशयितांविरूद्ध भुसावळ येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात ङ्गटाडाफ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सर्व संशयितांची नाशिकच्या विशेष न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी 25 वर्षानंतर निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याची नियमित सुनावणी करून निर्णय घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाशिक न्यायालयाला आदेश दिले होते. त्यानुसार विशेष मोक्का व टाडा न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.एच.खटी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. यातील मुख्य संशयित माजी उपनगराध्यक्ष हाजी शेख शफी पहेलवान , जमील अहमद खान, डॉ. मोहम्मद युनुस फलाही, युसुफ खान गुलाब खान, वसीम एजाज शेख,अय्युब इस्माईल खान,डॉ.सय्यद अशफाक मीर,मुजफर मीर यांना भुसावळ येथून तर त्यांच्यासह मुंबई येथून डॉ.मो.हारून अन्सारी,अब्दुल कादिर हबीबी,अब्दुल मन्नान,फारूक नजीर खान अशा 11 संशयितांविरूद्ध देशविघातक कृत्य करणे, धार्मिक भावना भडकावून दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कट कारस्थान रचण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करून तत्कालीन पोलीस अधीक्षक दिपक जोग व सहकार्‍यांनी अटक केली होती. हा प्रकार 1994 मध्ये घडला होता तत्कालीन पोलिस निरीक्षक के. डी. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याप्रमाणे ङ्गटाडाफ अन्वये दोषारोपपत्र दाखल होऊन संशयितांना अटक करण्यात आली होती
गुन्ह्यात तपासी अधिकार्यांनी जवळपास 25 हून अधिक साक्षीदार मिळविले होते. हा खटला 1999 पासून नाशिकच्या विशेष न्यायालयात सुनावणीसाठी आला. मात्र, केंद्र सरकारने टाडा कायदाच रद्द केल्याने त्याचा फायदा संशयितांना मिळविण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. अखेरीस 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयात हा खटला दाखल होऊन त्यावर 2017 मध्ये हे प्रकरण नाशिक न्यायालयाने नियमित कामकाज चालवून खटला निकाली काढण्याचे आदेश दिले होते. यामुळे या गुन्ह्यात साक्षीदार अथवा सबळ पुरावाच उपलब्ध न झाल्याने न्यायालयाने सर्व 11 संशयितांची निर्दोष मुक्तता केली.सरकार तर्फे ऍड.अजय मिसर तर संशयितांतर्फे ऍड.शरीफ शेख यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.