पाणी चोरी रोखण्यासाठी धाडसत्र

0

गिरणा के. टी. वेअर मधील दोन इलेक्ट्रिकल मोटारी जप्त

पाचोरा (दि.28) –
पाचोरा शहराला गिरणा पुरवठा करणार्‍या गिरणा के टी वेअर मघे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा उपावेक्षक किरण बाविस्कर, साहेबराव खैरनार, सावळाराम, आनंद शिंदे, संजू पाटील, धर्मा सोनवणे, आबा पाटील, सचिन सोनवणे, या पथकाने दिनांक 27 रोजी रात्री 11:00 ते सकाळी 4:30 वाजेपर्यंत धाडसत्र टाकून शेतीला चोरुन पाणी पुरवठा करणार्‍या दोन इलेक्ट्रिक मोटारी जप्त करून पालीकेत जमा केल्या. या के. टी. वेअर मधे अल्पसा जलसाठा असल्याने या पुढेही कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती किरण बाविस्कर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.