चुकूनही एकत्र खाऊ नका.. थंड आणि गरम पदार्थ; जाणून घ्या दुष्परिणाम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आपल्याला अनेक वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या सवयी अथवा आवडी असतात, यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होते. म्हणून अनेकदा असं म्हटलं जात की, जिभेवर नियंत्रण आरोग्याचे संरक्षण. अनेकांना सवय असते की गरमागरम चहा प्यायचा आणि त्यावर थंड पाणी प्यायचे. या सवयीचे आरोग्यावर  अतिशय दुष्परिणाम होते.  अनेकदा आपल्या या सवयी आपल्याला आजारपणाकडे ओढून नेतात आणि आपल्या हे लक्षातही येत नाही. सध्या हिवाळा सुरु असल्यामुळे अनेक लोकांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले असेल. यामुळे शरीराचे निर्जलीकरण होतेच. शिवाय याचा परिणाम थेट त्वचेवर दिसून येतो.

अयोग्य आहारामुळे सर्वात आधी त्वचेवर प्रभाव दिसून येतो. याचे बिघडत्या आरोग्याचे संकेत देऊ लागतो. यानंतर हळूहळू आपल्या आरोग्याचे खोलवर नुकसान करतो. याबाबत आयुर्वेदातही उल्लेख केला आहे. जसे कि थंड आणि गरम पदार्थ कधीच एकत्र खाऊ नये. यामुळे त्वचेत कोरडेपणा येऊन वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. याशिवाय पचनासंबंधित आजार होण्याचीही शक्यता वाढते. म्हणूनच असे कोणतेही अयोग्य संयोजन आहार केल्यास होणारे दुष्परिणाम गंभीर असू शकतात.

> पचनक्रियेत अडसर – अयोग्य आहार खाल्ल्याने किंवा कोल्ड्रिंक – चहा एकत्र प्यायल्याने याचा परिणाम पचनक्रियेवर होतो आणि यामुळे पचनक्रिया मंदावते.

– असे झाल्यास मध जास्त प्रमाणात खाऊ नका.

– शिवाय मुळा, मासे वा चिकनसारख्या गोष्टी खाणे टाळा. कारण पचन मंद होताना या गोष्टी खाल्ल्याने चयापचय क्रियेवर अधिक परिणाम होतो.

> विरोधी आहार नको – दोन विरोधी गुणधर्म असलेले अन्न एकावेळी खाणे आरोग्यासाठी नुकसान दायक असते. जसे कि दही – मासे वा मुळा – चहा. असे पदार्थ वेगवेगळ्या प्रकृतीचे असतात. ते एकत्र खाल्ल्याने त्वचेतील कोरडेपणा वाढतो.

– शिवाय मिठापासून बनवलेल्या पदार्थांसह दूध प्यायल्यासदेखील आरोग्याचे नुकसान होते.

> सूर्यप्रकाशात अधिक वेळ घालणे – प्रमाणापेक्षा जास्त वेळ उन्हात राहिल्यास आरोग्याचे नुकसान होते हे आपण जाणतोच. मात्र अश्यावेळी अचानक थंड पदार्थाचे सेवन केल्यास याचा आपल्या पचनक्रियेवर थेट परिणाम होतो.

– म्हणून एकतर उन्हात जास्त वेळ थांबणे टाळा.

– सनस्कीन लोशन, टोपी अश्या गोष्टींचा वापर करा.

> आंघोळ करताना चुका करू नका – शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केल्यानंतर त्वचेत कोरडेपणा येतो. शिवाय अधिक वर्कआऊट केल्यानंतर शरीरातील नसा ब्लॉक होऊ शकतात. त्यात वर्कआउट केल्यानंतर आंघोळ करत असाल तर, लगेच मॉइश्चरायझर वापरा. अन्यथा त्वचेचे नुकसान होते.

– याशिवाय आंघोळ करण्यापूर्वी शरीरावर तेलाची मालिशदेखील करू शकता.

– तसेच वर्कआउटनंतर लगेच खूप थंड किंवा खूप गरम पाणी वापरू नका. यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.