चाळीसगाव येथे कांदा प्रश्न पेटला

0

रयत सेनेच्या आंदोलनानंतर 700 रुपये प्रति क्विंटल काद्याला भाव

चाळीसगाव प्रतिनिधी –

राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये काद्याला चांगला भाव मिळत असतांना चाळीसगाव बाजार सामिती मध्ये मात्र शेतकर्‍यांची फसवणूक होऊन कमी भाव मिळत असल्याने दि 2 रोजी शेतकर्‍यांनी दुपारी 12 वाजेच्या सुमारास काद्याला चांगला भाव मिळावा यासाठी मार्केट समोर आंदोलन केले होते बाजार समितीच्या प्रशासनाने या आंदोलनाला कुटलाही प्रतिसाद न दिल्याने अखेर दुपारी 1,30 वाजेच्या सुमारास रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आंदोलनाचे नेतृत्व केल्याने बाजार समिती संचालक व प्रशासन व व्यापार्‍यांनी दोन पावले मागे जात तब्बल दिडसे रुपये प्रति क्विंटल काद्याला भाव वाढवून दिल्याने उपस्थित शेतकर्‍यांनी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व पदाधिकारी कार्यकर्त्याचे आभार मानुन आंदोलन थांबविण्यात आले
राज्यातील लासंगाव मनमाड .नांदगाव उमराणे आदि बाजार समित्यांमध्ये काद्याला 8 ,50 रुपये प्रति क्विंटल च्या पुढे भाव दिला जात आहे मात्र चाळीसगाव बाजार समितीत फक्त 3,50 ते 5 ,50 रुपये दराने प्रति क्विंटल कादा व्यापारी खरेदी करत असल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याबाबत बाजार समिती सभापती व प्रशासनाशी वेळोवेळी संपर्क साधुन तक्रारी केल्या असता तरी देखील भाव जैसे थे परिस्थिती असल्यामुळे शेतकरी संतापलेल्या शेतकर्‍यांननी दि 2 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास नागद रोडवरील बाजार समिती समोर उग्र रुप धारण करून आंदोलन सुरू केले हे आंदोलन चिघळत असल्याने त्या ठिकाणी चाळीसगाव पोलीस प्रशासन तेथे येउन त्यांनी आंदोलन थाबविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शेतकरी काही प्रमाणात भयभित झाले होते सदर माहिती रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांना शेतकर्‍यांनी मोबाईलवर सांगितल्यावर त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दुपारी 1,30 वाजेच्या सुमारास धाव घेऊन आंदोलनाचे नेतृत्व केले शेतकर्‍यांना इतर बाजार समित्या प्रमाणे भाव द्यावा अशी मागणी लावुन धरली व जवळपास दोन तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर त्या ठिकाणी बाजार समितीचे उपसभापती महेंद्र पाटील व जेष्ठ संचालक प्रदीपदादा देशमुख यांनी येवुन आंदोलकांशी चर्चा केली व व्यापार्‍यांशी बोलुन शेतकर्‍यांच्या काद्याला भाव भाव देण्याची भूमिका घेतली प्रदीपदादा देशमुख यांनी यशस्वी चर्चा केल्यानंतर काद्याला गुणवत्तेप्रमाणे 700 रुपये भाव देण्याचे ठरल्यावर त्यावेळी रयत सेनेने व शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले आंदोलनाचे नेतृत्व करून शेतकर्‍यांच्या काद्याला भाव मिळवुन दिल्याने शेतकर्‍यांनी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले यावेळी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार पंकज पाटील. अनिल मराठे. विवेक शिंदे .मुकुंद पवार. संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व शिंदी येथील शेतकरी अनिल जाधव शिवापूर शेतकरी उमेश राठोड वलठाण चे शेतकरी हेंमत राठोड. शिवापूर चे शेतकरी रघुनाथ चव्हाण.रहिपुरी चे शेतकरी लक्ष्मण दाभाडे तसेच राष्ट्रवादी युवक कॉग्रेस चे जिल्हाउपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील आंदोलनात सहभागी झाले होते तर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे व पोलीस प्रशासनाने चोख बदोबस्त ठेवला होता

Leave A Reply

Your email address will not be published.