भुसावळ रेल्वे स्थानकावर विशेष पथकातर्फे कारवाई

0

भुसावळ, दि.2-
भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवासी गाड्यांमधील व स्थानकावरील फुकट्या तसेच अतिरिक्त सामान घेउन प्रवास करणार्‍या प्रवाशांविरुद्ध 02 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यत विशेष तपासणी पथकातर्फे मोहीम राबवण्यात आली . या मोहीमेत सूमारे 286 केसेस करण्यात आल्या तर 1 लाख 36 हजार 685 रूपये कारवाईव्दारे दंड वसूल करण्यात आला आहे . हि मोहिम सहायक वाणिज्य प्रबधक अजय कुमार याच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली असून पथकात 38 तिकीट निरीक्षक व 16 रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
रेल्वे स्थानकांवर या विशेष तपासणी मोहिमेत बिना तिकीट प्रवास करणार्‍या 137 प्रवाशांकउून 65 हजार 205रूपये- दंड ,अनियमित प्रवास करणारे केसेस 146 यामध्ये दंड 70 हजार 730/- आणि बिना बुक केलेला सामान नेणें अशा केसेस 3 केल्या असून यामध्ये दंड 750 /- दंड वसूल करण्यात आला .
या विशेष मोहिमेत सूमारे 286 केसेस या दंड 1 लाख 36 हजार 685/- प्रवाशा कडून दंड वसूल केला. यामध्ये तिकीट चेकिंग स्टाफ एन पी पवार,वी के भंगाळे ,वाय डी पाठक,हेमंत सावकारे ,आर पी सरोदे ,एल आर स्वामी,ए के गुप्ता ,ए एम खान ,अनिल खर्चे ,अजय बच्छाव ,निलेश पवार ,ए एस राजपूत ,निलेश पवार ,श्रीमती पुष्पा पांडे ,बी एस महाजन सर्व तिकीट कर्मचारी सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.