चाळीसगाव महाविद्यालयात दलित साहित्यावरील इंग्रजी आंतरराष्ट्रीय वेबीनार संपन्न

0

चाळीसगाव – येथील बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयात इंग्रजी  विभाग आणि  आई क्यू ए सी  यांच्या संयुक्त विद्यमाने “दि रेलीवंस ऑफ दलित लिटरेचर इन कोनटेमपोररी इंडिअन लिटररी सीन ” या विषयावर आंतर राष्ट्रीय वेबिनार दि.२५ रोजी  आयोजित करण्यात आला. वेबिनारचे प्रास्ताविक प्रा.पी.आर.पाटील यांनी केले. वेबिणार चे अध्यक्षीय उद्घाटन महाविद्यालाचे प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी केले. वेबिनारचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद व्ही.बिल्दीकर यांनी आपल्या मनोगतात याविषयावर मार्गदर्शन केले.   विषयाच्या मांडणीत त्यांनी दलीत आत्मकथा,दलीत काव्य,ब्लॅक पँथर चळवळ,भारतीय सामाजिक मानसिकता यावर परखड मत मांडले. भारतीय संविधानाचा ही आढावा घेऊन भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आरक्षण,भारतीय समाज,राजकारण यावरील भूमिका अधोरेखित केली. दलीत समाज,त्यांचे शिक्षण,आजची दलीत साहित्याची दिशा आणि त्यातील होत जाणारे काळानुसार चे बदल याचा ही आढावा त्यांनी घेतला.

या वेबिनारसाठी देशभरातून, विविध राज्यातून एकूण १११६ जणांनी सहभाग नोंदवला. या देशविदेशातून विविध विद्यापीठ मधून प्राध्यापक,रिसर्च स्को लर,विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. उल्लेखनीय बाब म्हणजे विदेशातून म्यानमार,श्रीलंका,आफ्रिका,फिलिपिन्स,बांगलादेश,इराक़,नैजेरिया,मोरीशस,हॉंगकॉंग आणि ओमान येथून सहभाग नोंदवला  गेला. वेबीनार हा झूम हा डिजिटल प्लाटफोर्म आणि फेसबुक लाइव यावर एकाचवेळी आयोजित करण्यात आला. वेबिनार समन्वयक प्रा.रविंद्र बोरसे यांनी सूत्र संचालन केले तर प्रा.सलमान पठाण  यांनी उपस्थितांचे आभार मानले. वेबिनारच्या यशस्वीते साठी मान.नारायण भाऊ अग्रवाल,चेरअमन, चाळीसगाव एजुकेशन सोसायटी, आई क्यू ए सी समन्वयक उप प्राचार्य प्रा.अजय काटे   यांनी मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.