चाळीसगाव पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील अपात्र

0

चाळीसगाव :- चाळीसगाव पंचायत समितीचे उपसभापती  सुनील पाटील यांना जळगाव जिल्हाधिकारी यांनी अपात्र म्हणून घोषित केले,

चाळीसगाव पंचायत समितीचे भाजपचे सदस्य असलेले सुनील पाटील यांनी चाळीसगाव पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे सभापती पदाचे उमेदवार अजय पाटील यांना मदत करून व  उपसभापती निवडणुकीत स्वत: उपसभापती होण्याचा मानही मिळविला होता.

या निवडणुकीत सुनील पाटील यांनी भाजपच्या व्हीपचा अनादर केला म्हणून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली असल्याचे समजते ‌.

या अपात्र घटनेबाबत आमचे प्रतिनिधी यांनी उपसभापती  सुनील पाटील यांच्याशी संपर्क केला असता ,त्यांनी सांगितले की जिल्हाधिकारी   यांच्या निर्णयाविरोधात नाशिक आयुक्त यांच्याकडे या निर्णयाविरुद्ध दाद मागणार आहोत असे सांगितले,

Leave A Reply

Your email address will not be published.