निकृष्ट दर्जाची रस्ता दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांसह शाखा अभियंत्यावर कारवाईची मागणी

0

बोदवड – शहरातील जामठी रोडवरिल बळीराजा मंगल कार्यालय ते दिवाणी व फौजदारी न्यायालयाकडे जाणा-या रस्त्यावर करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्ता दुरूस्तीची नव्याने तात्काळ दुरुस्ती करण्यात करावी अशा आशयाची तक्रार शहरातील सामाजिक कार्यकर्ते जाफर मण्यार यांनी नुकतीचं बोदवड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिले आहे.

शहरातील जामठी रोडवरिल बळीराजा मंगल कार्यालय ते दिवाणी व फौजदारी न्यायालयाकडे जाणा-या रस्त्याची दुरूस्ती बोदवड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या काही दिवसांपुर्वी करण्यात आली होती.मात्र सदर रस्त्यावर करण्यात आलेली दुरुस्ती ही देखावा म्हणून करण्यात आली असून आजरोजी सदरचा रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे.एकंदर सदर रस्त्याच्या दुरुस्तीवर करण्यात आलेला खर्च हा पाण्यात गेल्याचे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

रस्ता दुरूस्ती करूनही रस्त्याची परिस्थिती ‘जैसे ते तेचं’ असल्याने संबधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे यांसह सदर रस्त्यावर दुरूस्तीच्यावेळी नियंत्रक म्हणून नेमणूक असलेल्या शाखा अभियंत्यावर सुध्दा कारवाई करावी व तात्काळ रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी जाफर मण्यार यांनी तक्रारीव्दारे केली असून केलेल्या कारवाईची अहवाल मिळावा जेणेकरून सदर रस्त्याची गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून पडताळणी करता येईल असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.