गांजाची तस्करी करणारा अटकेत

0

जळगाव (प्रतिनिधी);-  शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनला  गांजा तस्करी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील एका फरार आरोपीला आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. रामचंद्र रामदास पावरा (वय-३७,रा. महादेव, जि.धुळे ) असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

 

एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यापासून रामचंद्र पावरा हा मिळून येत नव्हता. सदर गुन्ह्यातील अन्य आरोपी शेख युसुफ शेख मुसा याने त्याच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर पण रंगाची कार (एम.एच-१२,के.एन.५१६९) मध्ये १ लाख ६९ हजार २९० रुपये किमतीचा ३३.५८ किलोग्राम वजनाचा हिरवट रंगाचा गांजा मिळून आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी रामचंद्र पावरा हा शिरपूर तालुक्यातील महादेव या गावी येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रवीण मांडोळे यांना आरोपीला ताब्यात घेण्यासाठी रवाना केले. या पथकाने महादेव गावात सापळा रचून रामचंद्र पावरा यास अटक करून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.