अट्टल घरफोड्याला एलसीबीच्या पथकाने केली अटक

0

जळगाव (प्रतिनिधी) घरफोडीच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका अट्टल घरफोड्याला एलसीबीच्या पथकाने शिताफीने अटक केली असून त्याला पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीस स्टेशनला ताब्यात देण्यात आले आहे. प्रदीप लोटन कोळी (वय-२७, रा.सुटकार ता.चोपडा) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, चोपडा तालुक्यातील सुटकार या गावातील प्रदीप कोळी हा तरुण जळगाव व चोपडा शहरात घर पुढच्या उद्देशाने फिरत असतो. त्या अनुषंगाने श्री. बकाले यांनी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, अशोक महाजन, सुरज पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश महाजन यांचे पथक रवाना केले. या पथकाने आज सुटकार गावातून प्रदीप कोळी यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने रामानंद नगर तसेच चोपडा शहर पोलीस स्थानकात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल, मोबाईल काढून दिला. दरम्यान प्रदीप कोळी यला पुढील तपास कामासाठी रामानंदनगर पोलिस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.