चाळीसगाव , चोपड्यात भाजपला दणका

0

भाजपा आठ, शिवसेना पाच तर राष्ट्रवादीचा दोन पंचायत समितीवर झेंडा : जळगाव पं.स.वर भगवा

जळगाव  लोकशाही चमूकडून – जिल्ह्यातील 15 पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींची निवड आज झाली. राज्यातील सत्तांतरानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. राष्ट्रवादीने चाळिसगाव आणि चोपड्यात परिवर्तन घडवून आणले आहे. चाळिसगावात भाजपा खासदार उन्मेश पाटील यांच्या समर्थक भाजपा सदस्याने बंडखोरी करत राष्ट्रवादीला साथ दिल्याने मुळे येथे भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. येथे राष्ट्रवादीचे अजय पाटील सभापती, तर उपसभापतीपदावर भाजपाचे बंडखोर सुनील पाटील विराजमान झाले. चोपड्यात भाजपाकडून सत्ता खेचून आणण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. राष्ट्रवादीच्या कल्पना पाटील या सभापतीपदी विराजमान झाल्या असून उपसभापतीपदी भूषण भिल यांची निवड झाली.

जिल्हयातील 15 पंचायत समितीपैकी भाजपाने जिंकलेल्या पंचायत समितीचे सभापती व उपसभापती असे, जामनेर – सुनंदाबाई पाटील, पाचोरा – वसंत गायकवाड सभापती तर सौ.प्रतिभा ठिकरे – उपसभापती, अमळनेर – सौ.सुरेखा पाटील, उपसभापती भिकेश पाटील, भुसावळ – मनिषा पाटील सभापती, वंदना उन्हाळे उपसभापती, बोदवड  – किशोर गायकवाड, सौ.प्रतिभा टिकारे उपसभापती, यावल – सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती दिपक पाटील, मुक्ताईनगर – प्रल्हा जंगले सभापती, विद्या पाटील उपसभापती, रावेर – जितू पाटील सभापती, शारदा पाटील उपसभापती, शिवसेनाच्या पंचायत समिती अशा, जळगाव – नंदालाल पाटील सभापती तर संगिता चिंचोरे उपसभापती, पारोळा – रेखाबाई भिल सभापती, अशोक पाटील उपसभापती, एरंडोल – शांताबाई महाजन सभापती, अनिल महाजन उपसभापती, धरणगाव – मुकूंद नन्नवरे सभापती, शारदा पाटील उपसभापती, भडगाव – हेमलता पाटील सभापती तर राष्ट्रवादीचे प्रताप सोनवणे उपसभापती आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.