बोदवडातील शिव जिंनिंगमध्ये चोरी ; ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

0

बोदवड – शहरातील मनुर रोडवरील शिव नामक जीनींग मध्ये काही अज्ञात चोरट्यांनी १ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वी.कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जामठी रोडवरील शिव जिंनिंग व प्रेसिंग मध्ये १ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास जिनींगची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून त्यात रूई काढलेले ३ कपास गठाणी व गठाण वाहतूक करण्याची ट्राली असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याबाबत रमेश चंद्रमोहनलाल अग्रवाल वय (७० रा.ब-हाणपुर मध्य प्रदेश) यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी व त्यांच्या मुलगा मयुर अग्रवाल हे येथे दोन्ही व्यापार करीत असून यात दोन्ही पार्टनर आहेत.चोरी झाल्याची घटना आपल्याला आपल्या जिनिंग मध्ये काम करीत असलेल्या अर्जुन पवार यांने कळविली व त्यानंतर मी आपल्या ब-हाणपुर येथून जिनिंग मध्ये येऊन आम्ही पाहणी केली असता चोरी झाल्याचे दिसून आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.