घरकुल व किल्ले बनवणे स्पर्धा वरणगाव च्या शुभांगी वाणी, आणि डोंबिवली चे ओम अंकुश गडे प्रथम

0

जळगाव चितोडे वाणी समाज महिला मंडळा तर्फे घेण्यात आलेल्या घरकुल व किल्ले बनवणे स्पर्धेतील घरकुल गटात शुभांगी वाणी, वरणगाव तर किल्ला गटात ओम अंकुश गडे ,डोंबिवली यांचा प्रथम क्रमांक आला. चितोडे वाणी समाजासाठी शनिवार 6 नोव्हेंबर 2021 रोजी ऑनलाइन पध्दतीने ही स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेला उत्स्फूर्त उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत एकूण 20 स्पर्धकांपैकी 16 जणांनी किल्ला तर 4 स्पर्धकांनी घरकुल बनविले होते.
सुरवातीला मालती वाणी, शुभदा वाणी, शांता वाणी, पुष्पा वाणी यांनी दीपप्रज्वलन केले.
स्पर्धेचे परीक्षक मानसी भावसार आणि रश्मी गोखले यांचा परिचय शुभांगी यावलकर यांनी करून दिला.

चिवास महिला मंडळाचे अध्यक्ष सौ वंदना गडे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी सौ. शांताताई वाणी, सौ. संगीताताई अट्रावलकर यांनी आपले समयोचित मनोगत व्यक्त केले.
सर्वच स्पर्धकांनी अतिशय सुंदर रित्या किल्ले व घरकुल बनवले होते. अगदी छोट्या छोट्या बाल कलाकारांनी सुद्धा उत्तम रित्या किल्ले बनवले व त्या विषयी माहिती सांगितली.
सौ शुभांगी वाणी , वरणगाव यांनी आपल्या 35 वर्षापासून जपत आलेल्या घरकुल बनवण्याच्या परंपरे विषयी माहिती सांगितली.
या स्पर्धेतून सर्वांना संदेश मिळाला की, घरात बसून मोबाईल व टीव्ही वर वेळ घालवण्यापेक्षा आपल्या संस्कृतीचा व इतिहासाचा वारसा जपायला हवा आणि त्या विषयी माहिती जाणून घ्यायला हवी.
किल्ला बनवणे या गटात प्रथम क्रमांक आलेल्या ओम अंकुश गडे डोंबिवली याला रू. 501/-, द्वितीय क्रमांक हर्षल श्रीकांत वाणी, डोंबिवली यांना रू. 251/-, तर तृतीय क्रमांक आलेल्या स्वरूप स्वप्नील खारुळ , ठाणे यांना रू.151/- चे रोख बक्षिस देण्यात आले. तसेच घरकुल बनविणे स्पर्धेत सौ शुभांगी वाणी, वरणगाव यांना रू.501/- चे पारितोषिक देण्यात आले. सर्व विजेत्यांचे मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले.
सूत्रसंचालन सौ वैशाली अकोले आणि सौ छाया गडे यांनी केले तर उज्ज्वला वाणी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
ऑनलाइन स्पर्धा यशस्वीतेसाठी चिवास महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

चिवास महिला मंडळ जळगाव आयोजित घरकुल आणि किल्ला बनवा संपूर्ण स्पर्धा पाहण्यासाठी फक्त क्लिक करा~

Leave A Reply

Your email address will not be published.