ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचे स्थान कमी व्हावे !

0
अन्न वाचवा समिती देतेय खरीचा वाटा
(महेंद्र खोंडे)
जगातील भुकेच्या समस्येविषयी ग्लोबल हँगर इंडेक्स या संस्थेतर्फे जागतिक भूक अहवाल दरवर्षी प्रकाशित होत असतो. या इंडेक्सच्या सन २०१७ च्या अहवालानुसार जगातील ११९ देशामध्ये  भुकेची समस्या तीव्र स्वरूपात असून, यात भारताचा १०० वा क्रमांक लागतो. अहवालानुसार भारतात २० कोटी लोकांना एक वेळचे जेवणही पुरेशा प्रमाणात मिळत नाही. यामुळे दरवर्षी भूकबळी जाण्याची संख्या सरासरी ७ हजारांवर आहे. एकट्या उत्तरप्रदेश राज्यातच दररोज ६०० बालके भूकबळीचे लक्ष्य ठरत आहेत ही गंभीर परिस्थिती आहे. देशात होत असलेली धन्याची नासाडी हे यामागचे मुख्य कारण आहे.
आज १६ ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात अन्न वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या ज्येष्ठ मंडळींच्या अन्न वाचवा समितीचे कार्य उल्लेखनीय ठरत आहे. शिरपूर येथील  साधुमार्गी जैन संघ व स्वाभिमान प्रतिष्ठान शिरपूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी श्री विजयभाऊ बाफना ,श्री नवनीतजी राखेचा यांना शहरात होणारी अन्न नासाडी चिंतीत करत होती. यावर कार्य करण्याचे त्यांनी ठरविले. शहरवासीयांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी भेटेल त्या माणसाला अन्नाची नासाडी न करण्याचे सांगू लागले. हळू हळू या सत्कार्यामध्ये सामान विचारसरणीचे लोक जुळले. शासकीय, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर देशामध्ये प्रचंड प्रमाणात अन्नाची नासाडी होते हे त्यांच्या पाहतील लक्षात आले. याचे प्रमाण ५० ते ६० टक्के आहे. आणि म्हणून अन्नाच्या नासाडीवर जनजागृती व्हावी या हेतूने बाफना व राखेचा यांनी अन्न वाचवा समितीची स्थापना झाली. आज याला चार वर्षे होत आहेत.
समितीतर्फे अन्न वाचविण्यासाठी सदस्य सतत प्रयत्नशील असतात. समिती स्थापन झाल्यानंतर मंगल कार्यालये, बसस्थानके, रेल्वेस्टेशन, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये याठिकाणी अन्न वाचविण्यासंबंधी जनजागृतीचे फलक लावण्यात आले. यातून अन्न नासाडीचे दुष्परिणामांचा प्रसार होऊ लागला. अभियानाने चांगली गती धरली. समितिने पुढे अक्षदा वाचवा अभियान हाती घेतले. विवाह प्रसंगी शेकडो क्विंटल तांदूळ अक्षदा म्हणून वाया न घालवता वरवधूंवर पुष्पवृष्टी करण्याची संकल्पना राबविण्यावर समितीने जोर दिला. यातून मोठ्या प्रमाणावर उरलेला तांदूळ अन्न वाचवा समितीने भुकेल्या व गरजूंना वाटप केला. त्यांची भूक भागवली. आजही याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून शेकडो क्विंटल तांदूळ कचऱ्यात जाण्यापासून वाचविण्यात समितीला यश येत आहे. हॉटेल्स, मंगल कार्यालये तसेच घरातील वाचलेले अन्न शहरातील रोटी बँक व स्वाभिमान प्रतिष्ठान ह्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भुकेल्या व गरजूना वाटप केले जात आहे. नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाद येऊ लागला आहे. यामुळे आज या उपक्रमाची व्याप्ती वाढली आहे. २०१८ साली रोटी बँकेच्या व स्वाभिमान प्रतिष्ठानच्या  माध्यमातून समितीने विवाहसोहळे , गणपती भंडारे तसेच इतर सामाजिक उपक्रमातील उरलेल्या अन्नातून दीड लाखांहून अधिक भुकेल्यांची भूक भागवली आहे तर यातून ४० टन अन्न कचऱ्यात जाण्यापासून वाचविले आहे.
ह्या अभियानाची दखल विभागीय आयुक्तांनी घेत खान्देशातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अन्न वाचवा जनजागृतीचे फलक लावण्याची परवानगी दिली. तांत्रिक शिक्षण खात्यानेही खान्देशातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये हे फलक लावून जनजागृतीमध्ये आपला सहभाग दिला आहे. देशात भुकेने बळी जाणाऱ्यांची संख्या वाढत असताना, अन्न वाचवा समितीचे हे कार्य कौतुकास्पद आहे. या उपक्रमात सर्वानी सहभाग घेतल्यास ग्लोबल हँगर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक आणखी मागे जाण्यास निश्चितच मदत होऊ शकते.
असे होते कार्य
    अन्न वाचवा समितीमध्ये सर्व सदस्य हे नोकरीतून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक आहेत. व सामाजिक कार्यकर्ते, आहेत  समितीचे प्रवर्तक अनिलजी बाफना, नवनीतजी राखेचा, शातिलाल बुरड, सुनीलजी बाफना, हुकुचंदजी  सांडेचा,यांच्या बरोबर समाजाचे सर्व सदस्य स्वभिमान प्रतिष्ठानचे कार्यकर्ते एस कुमार, संजय कुमार, आमोल पाटील, छोटु मिस्त्री, मोहसीन बोहरी, हुजेफर बोहरी, मनोज संकलेचा, गणेश जैन, रमेशभाऊ बाफना, दुर्गेश चौधरी, महेंद्र महाजन  हे कार्यकर्ते कुठेही विवाह सोहळा किंवा सामाजिक कार्यक्रमाची माहिती मिळताच हातात फलक घेऊन व अन्न जागृतीविषयक घोषणांचे टी शर्ट घालून सोहळ्यात उभे राहतात. उपस्थितांमध्ये या फलकाचा परिणाम होतो आणि आपसूकच अन्न नासाडीवर अंकुश बसतो.
अन्न वाया घालवू नका
जगण्यासाठी माणसाला अन्नाची गरज भासते. परंतु अनेकांना एकवेळचे अन्नही मिळत नाही. अशावेळी आपण मात्र उरलेले अन्न कचऱ्यात फेकतो. हेच उरलेले अन्न भुकेलेल्यांना दिल्यास त्यांची भूक शमू शकते. आज जागतिक भूक दिन साजरा करत असताना देशातील भुकेने बळी जाणाऱ्यांच्या संख्येत कशा पद्धतीने घट करता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.
-विजय भाऊ बाफना (अन्न वाचवा समिती )

Leave A Reply

Your email address will not be published.