वाल्मिकी जयंतीचा बोदवड येथील शासकीय कार्यालयांना विसर

0
बोदवड – शहर तथा तालुक्यातील बहुतेक शिक्षण,आरोग्य व ग्रामपंचायत विभागात महर्षी वाल्मिकी जयंतीचा विसर पडला असून संबंधितांनी जाणुनबुजून जयंती ही साजरी केली नसल्याचा आरोप करीत दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीव्दारे सुरेश कोळी यांनी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बोदवड तसेच मुक्ताईनगर विद्युत कंपनी विभाग कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
कोळी यांनी दिलेल्या निवेदनात तिथीप्रमाणे दि.१३ आक्टोंबर रोजी राज्यांतील शासकीय तथा निमशासकीय कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात यावी असा शासन  निर्णय दि.२६ डिसेंबर २०१८ रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढण्यात आला असतानाही तालुक्यातील काही शाळेत,शिक्षण विभाग विद्युत वितरण कंपनीच्या शासकीय कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी केली नसल्याचा आरोप करीत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.