मी जिवंत असे पर्यंत पाचोऱ्याचे बिहार होवु देणार नाही

0

आमदार किशोर पाटलांचे व्यापाऱ्यांना आश्र्वासन

पाचोरा (प्रतिनिधी) :  गेल्या १० वर्षांपूर्वी पाचोरा – भडगांव शहरातील व्यापारी बांधव स्थानिक राजकारण्यांना त्रासले होते. मात्र मी सत्तेत आल्यापासून एकाही व्यापाऱ्याला माझ्यापासून त्रास झाल्याची तक्रार आलेली नाही. व यापुढेही मी जिवंत असे पर्यंत त्यांचे मागे खंबीरपणे उभा राहिल. पाचोऱ्याचे कधीही बिहार होवु दिले जाणार नाही. भडगाव येथे होवु घातलेल्या एम. ए. आय. डी. सी. च्या माध्यमातून शेतीमालावर आधारित सुतगिरणी, स्टार्च प्लॅन्ट या सारखे उद्योग उभारले जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या प्रगती सोबतच व्यापाऱ्यांना सुगीचे दिवस आल्यापासुन राहणार नसल्याचे अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी येथील जैन पाठ शाळेत झालेल्या व्यापारी मेळाव्यात दिली. व्यासपिठावर मुकुंद बिल्दिकर, नारायणदास पटवारी, दिपक सावा, श्याम खंडेलवाल, लक्ष्मण कोतकर, दिनेश अग्रवाल, पुरुषोत्तम पटेल, नसिर बागवान, कांतीलाल जैन, मेघराज केसवानी, अर्जुनदास दाखनेजा, उत्तम बागड, प्रदिप संचेती, मेघराज, केसवानी, भरत शेंडे, जगदिश पटवारी, मोतीलाल बोहरी, जगदिश माथुरवैश्य, रवि अग्रवाल, जगदिश खिलोशिया, एस. एस. पाटील, नरेंद्रसिंह सुर्यवंशी, राजेंद्र भोसले, आरीफ खान, आरीफ बागवान, संजय शिसोदिया, बापु सोनार, रवि केसवानी उपस्थित होते.
      शहरातील व्यापाऱ्यांशी हितगुज साधतांना किशोर पाटील यांनी सांगितले की, आपण मला गेल्या वेळेस नगरपालिका व विधानसभा हाती दिल्यानंतर मी शहरात भुयारी गटारी, बहुळाहुन तातडीची पाणी पुरवठा योजना, अद्यावत स्मशानभुमी, साडेतीन कोटीचे इ वाचनालय, चार हजार पोलवर एल.ई. डी. बल्ब, शहराच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही कॅमेरे, या सारख्या अनेक सुविधा पुरविण्यात आपल्यामुळे यशस्वी झालो असून भविष्यात शहरवासीयांना दिवसाआड पाणी देण्यासाठी थेट गिरणा धरणावरुन १८५ कोटिची पाईप लाईन व्यापारी बांधवांसाठी व्यापारी भवन,येत्या एक वर्षात शहरात १०० टक्के कॉंक्रीटीकरण, जड वाहाने शहरात येण्यासाठी स्मशान भूमीजवळ हिवरा नदिवर पुल, करण्याचा संकल्प केला असून ही कामे न झाल्यास पुढील नगरपरीषदेच्या निवडणूकीत आपल्याकडे मते मागण्यासाठी येणार नाही, या वेळी आमदार किशोर पाटील यांनी माजी आमदार दिलीप वाघ यांचेवर टिका करुन त्यांनी पाच वेळा नगरपरीषदेत सत्ता भोगली मात्र विकासाची कामे न करता व्यापाऱ्यांना गंडविण्याचे काम केले, पी टी सीच्या नावाखाली भडगांव रोडवरील चार एकर जमीन हडपण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असून ते मी कदापीही शक्य होऊ देणार नाही, कार्यक्रमात मुकुंद बिल्दिकर यांनी आमदार किशोर पाटील यांनी पाच वर्षात ८०० कोटिच्या विकास कामांचा आढावा सादर केला, यावेळी व्यापाऱ्यानी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आनण्याचे आस्वासन दिले, कार्यक्रमात, नगराध्यक्ष संजय गोहिल उपनगराध्यक्ष शरद पाटे,दत्ता बोरसे, गणेश पाटील, नगरसेवक सतिष चेडे,राम केसवानी, धर्मेंद्र चौधरी, वाल्मीक पाटील आनंद नवगिरे,रवी चोरपगार, जी एम पाटील,रवी केसवाणी राजेंद्र भोसले, प्रदिप महालपूरे सह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते, सुत्रसंचलन नाना वाघ प्रास्ताविक शरद पाटे तर आभारप्रदर्शन रवी केसवाणी यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.