ग्रामसेविका सुट्टीवर गेल्याने ग्रामपंचायत वाऱ्यावर

0

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण येथील ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका सुटीवर गेल्याने ग्रामपंचायत कार्यलय बंद आहे. तर कर्मचारी वेतन अभावी घरी असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय वाऱ्यावर असून येथे नवीन ग्रामसेवक नियुक्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

थोरगव्हाण येथील ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका २ ऑक्टोबर पासून एक महिन्याच्या रजेवर गेल्या आहे तर येथील कर्मचाऱ्यांना पगार नसल्यामुळे कर्मचारी घरीच असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांवर गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची वेळ आली आहे.

ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका एक महिन्याच्या सुटीवर गेल्या असुन येथे प्रभारी ग्रामसेवक नियुक्त करण्याची जबाबदारी यावल प. स. विभागाची आहे. मात्र वीस दिवस झाले तरी अद्यापही कुठल्याही ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली नसल्यामुळे ग्रामसेवक अभावी येथील ग्रामस्थ विविध समस्यांनी त्रस्त झाले आहे.

सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी यावल प.स. प्रभारी गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन ग्रामसेवक सुटीवर गेल्यामुळे पदभार कुणाकडे दिला आहे, यांची विचारणा केली असता एक दोन दिवसात दुसऱ्या ग्रामसेवककडे पदभार नियुक्त करण्यात येईल असे सांगण्यात आले. ग्रामसेवक अभावी रहिवाशी दाखले, घराचा उतारा, दारिद्र दाखलासह विविध प्रकारच्या कागदपत्रांकरिता ग्रामस्थांना अडचणी येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.