ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला- किरीट सोमय्यांचा आरोप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आतापर्यंत आघाडीच्या एकूण ११ मंत्री आणि नेत्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर आपल्याकडे आणखी दोन मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे असून त्यातील एका मंत्र्याचा घोटाळा आपण सोमवारी उघड करू असे सोमय्या यांनी जाहीर केले होते. याप्रकरणी  स्वतः त्यांनी शनिवारी याबाबत सांगितलं. मात्र त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावे उघड न केल्याने तर्कवितर्क सुरू झाले होते, आणि अखेर आज किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे आणि या पत्रकार परिषदेत सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर शेकडो कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केलाय. इतकंच नाही तर सोमय्यांनी २७०० पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, एनसीपीच्या नेत्याचा घोटाळा काढला आता शिवसेनेचा नेत्याचा घोटाळा बाहेर काढेल.  तर उद्या अर्थातच १४ सप्टेंबरला इडिकडे तक्रार करेल, तर तर दुसरीकडे दिल्लीत अर्थ मंत्रालयात ही सोमय्या हातात अधिकृत तक्रार करणार आहेत. तर नाविद मुश्रीफने देखील शेल कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. असा देखील आरोप करण्यात आलाय.

ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावं मी जाहीर केली होती. दुर्दैवाने राखीव नावं आहेत. प्रताप सरनाईक, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अनिल परब, अनिल देशमुख, यांची नावं होती. आता यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियाने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. फक्त तेव्हढचं नव्हे तर बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे २७०० पेजेसचे पुरावे आहेत, ते मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिले आहेत.

बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी २ कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे.नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवल आहे त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, २ कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे.हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. २०१८-१९  मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. बेनामी ट्राझॅक्शन १२७ कोटींचे व्यवहार समोर आले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी बजरंग खरमाटे यांच्या संपत्तीची पाहणी केल्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी किरीट सोमय्या यांनी यावेळी शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भावना गवळी, छगन भुजबळ अनिल परब यांना लक्ष्य केलं. तर, पत्रकारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपबद्दल काय भूमिका आहे, असं विचारलं असता राज्य सरकारनं त्याप्रश्नी कारवाई करावी, असं म्हणत किरीट सोमय्यांनी प्रश्नाला बगल दिली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.