गिरड के. टी. वेअर मधून 3 मोटारी जप्त

0

पाचोरा, दि. 13-
शहरासाठी पाणीपुरवठा हा ओझर केटीवेअर बंधार्‍यातुन करण्यात येतो. यासाठी पाणी जास्त जास्त काळ शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून पाचोरा नगरपालिका तर्फे पाणीपुरवठा व आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी धडक मोहीम राबवून पाणी चोरी करणार्‍या शेतकर्‍यांच्या इलेक्ट्रीक मोटारी जप्त केल्या.
यावेळी शेतकर्‍यांनी हातात कोयता घेऊन धडक मोहीम थांबविण्याचा प्रयत्न केला परंतू यावेळी उप अवेक्षक किरण बाविस्कर यांनी शेतकर्‍यांना सांगितले की, या बंधार्‍याच्या पाणीसाठ्यावर पाचोरा शहराच्या एक लाख लोकसंख्येच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. तसेच ह्या पाण्याचे आवर्तन बिगर सिंचन व फक्त पिण्यासाठीच जिल्हाधिकारी, जळगाव यांनी सोडलेले आहे. आमच्या सरकारी कामात अडथळा आणू नका अशी विनंती केली. त्यावेळी भट्टगाव, माडंकी, या शिवारातील तीन इलेक्ट्रिक पंप या पथकाने जप्त केले . या मोहिमेत किरण बाविस्कर प्रकाश गोसावी, साहेबराव खैरनार, नरेश आदिवाल, संजय जाधव, निळकंठ ब्राह्मणे, संजय जगताप ,सुनील वाकडे ,विजय ब्राह्मणे आकाश खेडकर, युसुफ पठाण याच्यासह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.