शिरसमणी येथे विद्यार्थ्यांनी केला रास्ता रोको

0

पारोळा, दि. 13-
तालुक्यातील शिरसमणी येथे आजसकाळी 10:00 वा शिरसमणी हुन पारोळा येथे कॉलेजला जाणार्‍या विद्यार्थ्यांनी रा प बसेस अडवून रास्ता रोको केला.विद्यार्थ्यांना सतत अपडाऊन करण्यासाठी होणार्‍या त्रासाला कंटाळून त्यांनी आज शिरसमणी येथे बसेस थांबवून रा प मंडळाचा निषेध केला. कॉलेज व शाळेची वेळ 11:00 असून वेळेवर कधीच बस येत नाही. कधी कधी तर या फेर्‍या सुद्धा बंद असतात परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. व अनेकवेळा लेखी तोंडीं तक्रारी देऊन सुध्दा दखल घेतली जात नाही.म्हणून विद्यार्थ्यांनि हे पाऊल उचलले. तसेच काल याच बस मधून शिरसमणी येथील दोन विध्यार्थी बसचा दरवाजा तुटल्याने चालत्या बसमधून खाली पडून त्यांना गंभीर जखमी झाले असून ते दवाखान्यात ऍडमिट आहेत.या घटनेला चालक व वाहक जबाबदार असल्याबाबत काल पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिरसमणी येथुन येणार्‍या विद्यार्थ्यांना जादा बस सोडण्याबाबत अमळनेरचे नियंत्रक अर्चना भदाणे यांनी लेखी आश्वासन दिले होते. परंतु आज पुन्हा बस वेळेवर आली नाही व जादा बसही सोडली नाही.म्हणून उशिरा आलेली बस जाऊ देणारं नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला त्यामुळे बराच वेळ दोन बसेस शिरसमणी येथे थांबून होत्या.गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन,चेतन पाटील,रोहीदास पाटील यांनी विध्यार्थ्याची समजुत काढली व पोलीसासमोर उद्या पासून बसेस ची फेरी वाढून नियमित व वेळेवर बसपाठवू असे आश्वासन रा प कर्मचारी भानुदास वाघ यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.