रिगणगाव येथील आठ इसमांना अटक

0

एरंडोल, दि. 13-
गाईची वाहतूक करणार्‍या वाहनाला पेटवल्या प्रकरणी 13 फेब्रुवारी 2019 रोजी पहाटे 3 – 55 वा. एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला, याप्रकरणी रिंगणगाव येथील आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींना एरंडोल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आ. डॉ सतीश पाटील यांनी पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांना भेटून घटनेची माहिती जाणून घेतली,
आरोपी मध्ये प्रमोद गोपीचंद पाटील, महेंद्र किसन माळी, शिवाजी एकनाथ पडवळ, वाल्मिक पुंडलिक शिंदे, रामकृष्ण नारायण रोहीमारे, योगराज साहेबराव लंके, निलेश एकनाथ पडोळ, अनिल संतोष शिंदे यांच्या समावेश आहे.
दरम्यान बजरंग दलाचे जिल्हा संयोजक राकेश लोहार, सहसंयोजक सचिन येवले व विनोद खाडे यांनीसुद्धा एरंडोल पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेबाबत माहिती घेतली.
एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पिंपळकोठा प्र.चा. येथे गुरांची वाहतूक करणारी टाटा मोबाईल कंपनीची एम एच 19 एस 8270 क्रमांकाची गाडी पकडण्यात आली होती. त्या ठिकाणी जमाव जमला होता याबाबत पोलीस पाटील हुकुमचंद पाटील यांनी एरंडोल पोलिसांना कळविले पोलीस कर्मचारी संदीप सातपुते, मनोज पाटील व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी रात्री 8: 30 वाजता दाखल झाले. त्यावेळी वाहन चालक हा फरार होता, संतप्त जमावाने एका टायरची आवाज सोडून दिली होती. म्हणून मनोज पाटील यांनी ते टायर काढून स्टेफनी बसवली
यावेळी वाहनातील जनावरे ही चोरीची असावीत असा संशय जमावाने व्यक्त केला. त्याठिकाणी जमावात पिंपळकोटा प्र.चा., रवंजे व पंचक्रोशीतील गावाचे लोक जमले होते.
गर्दी वाढत असल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांनी सदर वाहन एरंडोल पोलीस स्टेशनला नेऊ व गाई बाबत चौकशी करू असे जमावाला आश्वासन देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला.
याप्रमाणे सदर वाहन एरंडोल कडे पोलीस गाडीसह नेत असताना रिंगणगाव पासून विखरण रस्त्यावर 500 मीटर अंतरावर गाडीतील एका गाईने उडी मारली व अंधारात तिने धूम ठोकली पाठीमागून 30 ते40 दुचाकी वाहने पोलिसांचा पाठलाग करीत येत होते.
पोलिसांनी वाहने न थांबवता विखरण च्या दिशेने नेण्याच्या प्रयत्न करीत असताना एक किलोमीटर अंतरावर गोवंश वाहतूक करणार्‍या वाहनाचे टायर फुटले व गाडी बंद पडली.
पोलीस निरीक्षक हजारे यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला.
जमावाने उर्वरित तीन गाई गाडी खाली उतरून गाडीची तोडफोड करून तिला पेटवून देण्यात आली.
जमावाला पोलिसांनी त्याबाबत मज्जाव केला असता पोलीस निरीक्षक हजारे यांना हाताने मारहाण करण्यात आली व पो. का. सातपुते यांच्या डोक्याला लाकडी काठी मारण्यात आली. त्यामुळे ते जखमी झाले एरंडोल ग्रामीण रुग्णालयात सातपुते यांच्यावर उपचार करण्यात आला.
गाडी पेटवली, सरकारी कामात अडथळा निर्माण केला असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला भा. द. वि. स. कलम 143, 147, 353, 332, 435, 341, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.