महसूल प्रशासनाने पकडलेला वाळूचा ट्रॅक्टर पोलीस मैदानातून पळविला, गुन्हा दाखल

0

चाळीसगाव,दि. 13-
चाळीसगाव शहरात महसूल प्रशासनाने पकडलेला अवैद्य वाळूचा ट्रॅक्टर पोलिस कवायत मैदान येथून पळवून नेल्याची प्रथमच खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती अशी की दिनांक 25 /1/ 2019 रोजी अवैद्य गौण खनिज पथकातील तलाठी पी एस महाजन व तलाठी दिनेश येडे यांनी टाकळी प्र चा येथे हसत खेळत या हॉटेल समोर रात्री साडे आठ वाजता वाळूने भरलेला ट्रॅक्टर टाकळी प्र चा कडून चाळीसगाव कडे येत असताना पकडले. ट्रॅक्टर चालकाची विचारपूस करीत असताना ट्रॅक्टर चालक ,ट्रॅक्टर सोडून पळून गेला, पाठलाग करूनही ट्रॅक्टर चालक सापडला नाही त्यामुळे जप्त केलेले विना क्रमांकाचे वाळूचे ट्रॅक्टर व ट्राली व त्यातील एक ब्रास वाळू पोलीस कवायत मैदानावर आणले.
मात्र हे ट्रॅक्टर दिनांक 13 रोजी सकाळी महसूल विभागाचे कर्मचारी भागवत आनंदा चव्हाण हे पाहण्यासाठी गेले असता सदर ट्रॅक्टर जागेवर आढळून आले नाही हे ट्रॅक्टर काल दिनांक 12 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पोलीस कवायत मैदानावर होते मात्र आज सकाळी वाळूने भरलेला ट्रॅक्टर गायब झाल्याचे आढळून आले असून हे ट्रॅक्टर ट्रॉली पळवून नेल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक(नाव गाव माहित नाही ) व मालक नितिन महाजन ह्यांच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने चाळीसगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे, कारण याच पोलीस कवायत मैदानावर चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस स्टेशन आहे.
***अवैध वाळू चोरांचे धाडस वाढले***
चाळीसगाव तालुक्यात वाळू चोरीचे प्रकरण गाजत असतानाच आज तर वाळू चोरांनी कहरच केला शहरात प्रथमच पोलीस मैदानावरून वाळूचे जप्त केलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याचे धाडस चोरांनी केल्यामुळे, या वाळूचोरांना नेमकं कोणाचं पाठबळ मिळते असा सवाल चाळीसगाव वासिय करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.