गांधी नगर भागात जुगार अड्डयावर छापा,पाच जणांवर कारवाई

0

 

भुसावळ (प्रतिनिधी)-

शहरातील गांधी नगर भागातील चामुंडेश्वर हुनमान मंदिर जवळील कॉम्प्लेक्सच्या  आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्डयावर  दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारी

पोलिसांनी अचानक छापा टाकला या छाप्यामध्ये ४हजार १०० रुपये रोख व सट्टा जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून

पाच जणांवर कारवाई केली आहे .

पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना  गांधी नगर भागात जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्या वरुन या ठिकाणी

छापा टाकला असता

जुगार खेळतांना संशयीत आरोपी पिंटू उर्फ दिपक सिताराम पाटील,विनोद पांडुरंग अनफाट,नितीन गणपत जगताप, मंगेश निकम,रफोद्दीन हुसनोद्दीन रा. भुसावळ आढळून आले या पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या छाप्यामध्ये ४हजार १०० रुपये रोख व सट्टा जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले

ही कारवाई स.फौजदार अनिल अडकमोल, पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ चेतन ढाकणे,बंटी कापडणे यांनी केली आहे .

याबाबत पो.कॉ.चेतन ढाकणे यांनी दिलेल्या  फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात मुंबई जुगार अँक्ट 12(अ) सह भादवी कलम 109 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ माणिक सपकाळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.