एरंडोल प्रांत अधिकाऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदान वाटपाबाबत च्या सुचने बाबत संभ्रमावस्था.

0

एरंडोल: – अतिवृष्टी अनुदान वाटपाबाबत येथील प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी तहसील कार्यालयात घेतलेल्या तलाठी व मंडळाधिकारी यांचे बैठकीत अतिवृष्टी अनुदान 29 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण वाटप करावे अशी सूचना केली मात्र या सुचने बाबत शेतकरी वर्गात संभ्रमावस्था दिसत आहे सामाईक खाते दारांना खातेफोड होऊन त्यांना या अनुदानाचा लाभ होऊ शकतो का? तसेच शेतकऱ्यांनी अध्याप देखील आपल्या बँक खात्याचे खाते क्रमांक तलाठ्याकडे दिले नाहीत ते दिलेल्या अल्टिमेटम च्या आत देणे शक्य आहे का? असे प्रश्न शेतकरीवर्गात चर्चेत आहे.

एरंडोल तालुक्यात एकूण अतिवृष्टी अनुदान 24 कोटी, 26 लाख, 37560,  इतके प्राप्त झाले असून पैकी 19 कोटी 55 लाख 55 हजार 92 रुपये एवढे अनुदान वितरित करण्यात आले आहे  अनुदान वाटपाचे काम जवळपास 95 टक्के पूर्ण झाले आहे उर्वरित दहा दिवसांमध्ये राहिलेले पाच टक्के अनुदान वाटप होणार का याची प्रतीक्षा शेतकरी वर्गास आहे तसेच अनुदान वाटपासंदर्भात ज्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहे त्या अडचणी महसूल प्रशासन युद्धपातळीवर सोडवून शेतकऱ्यांना दिलासा देणार आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान 1 कोटी 30 लाख 1533 एवढ्या अनुदानाचे  वितरण करण्यासाठी बँकेत जमा करण्यात आले आहे तसेच 50 लाखांचे बिल सुद्धा तयार करण्यात आले आहे.3 कोटी 12 लाख 44 हजार 368 एवढ्या रकमेच्या याद्या तलाठ्याकडून प्राप्त करून  अनुदान वितरणाचे काम सुरू आहे तलाठ्यांची विशेष मोहीम घेऊन शिल्लक बाकी खातेदारांची यादी तयार करून कार्यालयात सादर करणेबाबत सूचना देण्यात आली आहे  ज्यांनी आपल्या बँक खाते क्रमांक अध्याप तलाठ्याकडे कडे दिले नाही यांनी तात्काळ आपले बँक खाते क्रमांक तलाठ्याकडे द्यावे महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.