गणेश कॉलनीत बंद घराचे कुलूप तोडून चोरी; रोकडसह ऐवज लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव  शहरातील गणेश कॉलनी परिसरात राहणारे भरत जनार्दन लढे (वय ६४) यांचे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३१ हजार रूपयांचा ऐवज लांबविला. हा प्रकार काल बुधवारी ७.३० शेजारच्यांचा लक्षात आला. याप्रकरणी आज गुरूवारी २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चारेट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

भरत लढे हे आपल्या पत्नी व मुलासह एकत्र राहतात. ते सेवानिवृत्त कर्मचारी आहे. रविवार १८ जुलै रोजी सकाळी ७.३०  वाजता ते कल्याण, मुंबई येथे नातेवाईकांकडे गेले. त्यावेळी त्यांनी गणेश कॉलनीतील राहत्या घराला कुलूप लावले होते. त्यांच्या शेजारी राहणारे वृषाली विलास कोल्हे यांनी लढे यांच्या घराचे लॉक तोडलेले दिसून आले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता घरात संपुर्ण सामान अस्तव्यस्त केलेला प्रकार काल बुधवार २१ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आला.

शेजारी राहणारे वृषाली कोल्हे यांनी भरत लढे यांना मोबाईलद्वारे चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार लढे कुटुंबिया मध्यरात्री १ वाजता जळगावात दाखल झाले. आज गुरूवारी २२ जुलै रोजी जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून चोरी झाल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.