खा.उन्मेश पाटील गटात विभागणी ; जुन्या भाजप नेत्यांनी कंबर कसली

0

चाळीसगाव (आर.डी.चौधरी) :-चाळीसगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळवण्या वरून प्रचंड रणकंदन माजण्याची चिन्हे दिसत आहे .यंदा इच्छुक उमेदवारांची प्रचंड गर्दी झाल्याने भाजपाचा उमेदवार कोण असेल हे  निश्चित सांगता येणार नसले तरी भाजपाकडून हाच उमेदवार किती योग्य  व लायकीचा राहील, याबाबत उत्साही भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर वैचारिक वाद  चांगलेच रंगले आहेत. भाजपाकडून या मतदारसंघात जवळपास 28 उमेदवार इच्छुक असले तरी सोशल मीडियावर मात्र खासदार उन्मेश पाटील यांच्या गटातील  कार्यकर्ते हे उमंग महिला परीवार च्या अध्यक्षा  सौ संपदा पाटील ह्या  किती चांगल्या उमेदवार आहेत  हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत ,तर एकेकाळी त्यांचे खंदे समर्थक व व्यावसायिक मित्र युवा नेते मंगेश चव्हाण  यांचे समर्थक भा ज पा कार्यकर्ते हे युवानेते  मंगेश चव्हाण हे किती चांगले उमेदवार  होऊ शकतील , त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडून पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत, या त्यांच्या आरोप-प्रत्यारोप टीकाटिपणी मुळे चाळीसगाव करांचे सोशल मीडियावर चांगलीच करमणूक होत आहे.

चाळीसगाव तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील हे लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या जागी कुणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता चाळीसगाव करांना लागलेली आहे .खासदार उन्मेश पाटील यांच्या गटाकडून त्यांचे कार्यकर्ते  खासदार उन्मेश पाटील यांच्या   धर्मपत्नी व  उमंग महिला परिवाराच्या अध्यक्ष सौ संपदा पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत तर पक्षातीलच एकेकाळी उन्मेश पाटलाचे सर्व समर्थक कार्यकर्ते  हे युवा नेते मंगेश चव्हाण हेच कसे सर्वार्थाने योग्य उमेदवार आहेत  हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यातूनच पक्षांतर्गत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये  आरोप-प्रत्यारोपाच्या कलगीतुरा रंगत आहे त्यातूनच एकमेकाची अक्कल काढली जात आहे ,जसाजसा निवडणुकीचा काळ जवळ येत आहे हे तसे तसे या कुरघोडीच्या राजकारणाला उत येऊ लागला आहे.

तर दुसरीकडे गेल्या पाच वर्षात देशात व राज्यात  सत्ता असूनही सत्तेपासून वंचित ठेवण्यात आलेल्या भा ज पा च्या जुन्या-जाणत्या नेत्या व कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी कंबर कसली असून त्यांनी यावेळी काहीही झाले तरी  चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी  ही भाजपाच्या जुन्याच कार्यकर्त्याला मिळावी यासाठी कंबर कसली असून त्यांनी पक्षातील जून्या कार्यकर्त्यांना  उमेदवारी मिळवण्यासाठी मुंबई येथे  शिष्टमंडळाद्वारे जाऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी  फडवणीस साहेब, भाजपचे राज्यअध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील ,तसेच  जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याकडे आपली बाजू मांडताना सांगितले की, आता पक्ष हा मजबूत झाला आहे नवे व येणाऱ्यांची संख्या वाढतच राहील ! परंतु आतापर्यंत ज्या जुन्या व निष्ठावान मंडळींनी पक्षाची पोटतिडकीने कामे केली त्यांना  न्याय  केव्हा मिळेल,? म्हणून यावेळची विधानसभेची उमेदवारी  ही जुन्या कार्यकर्त्यांनाच मिळावी यासाठी आग्रही आहेत, त्यादृष्टीने तालुक्यातील सर्व  जुने मंडळी गेल्या पाच वर्षात सत्य पासून वंचित राहिले किंवा वंचित ठेवण्यात आली अशा सर्व  मंडळी  व इच्छुक उमेदवारांचा मेळावा लवकरच वैभव मंगल कार्यालया मध्ये घेण्यात येणार असल्याचे समजते,

या सर्व घडामोडी मध्ये खासदार उन्मेश पाटील यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे,

त्यामुळे खासदार उन्मेश पाटील हे उमंग महिला परीवारच्या  अध्यक्षा सौ संपदा पाटील यांच्या उमेदवारी साठी किती प्रयत्न करतात, किंवा ज्या युवा नेता मंगेश चव्हाण  यांनी विधान सभा व लोकसभा या निवडणुकीत   खासदार उन्मेश पाटील यांच्या साठी  अपार मेहनत घेतली .म्हणून शेवटच्या क्षणी त्यांना मदत करतात, किंवा मला नाही तर त्यालाही नको, म्हणून तिसरा पर्याय म्हणून जुने निष्ठावंत मधून डॉ संजीव पाटील यांचे नाव पुढे येते,

अशा पध्दतीने विधानसभा निवडणुकीच्या पहिलेच भा ज पा चे तिकीट जिंकण्यासाठी चढाओढ सुरू आहे. परंतु येणारा काळच सांगेल की चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भा.ज.पा.च्या तिकीटावर कोणाचं नाव लिहिले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.