शासनाच्या महापरिक्षा पोर्टल विरोधात बेरोजगार विद्यार्थ्यांचा एल्गार

0

चाळीसगावी तहसील कचेरीवर धडकले,

चाळीसगाव :- 

महाराष्ट्र शासनाने नुकत्याच महाराष्ट्रात  पोलीस भरती व इतर भरतीच्या  प्रक्रीयेत परिक्षा ह्या   महापरीक्षा पोर्टल द्वारे घेण्याचे जाहीर केल्याने महाराष्ट्राच्या तमाम बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये संतापाची ची लाट उसळली असून त्यांनी या भरती परिक्षा महापरिक्षा पोर्टल द्वारे परीक्षा न घेता ऑफलाइन पद्धतीनेच परीक्षा घ्याव्यात  अशी मागणी केली आहे..

या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजता चाळीसगाव तालुक्यातील अनेक भरती साठी तयारी करणाऱ्या पदवीधर बेरोजगार युवकांनी शासनाच्या या निर्णयाचे निषेध करून आपल्या मागण्याचे निवेदन मा.निवासी  तहसीलदार  श्री विशाल सोनवणे यांना दिले.

या निवेदनात पदवीधर बेरोजगार तरुणांचे म्हणणे आहे की, महापरिक्षा पोर्टल मुळे बेरोजगार विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे  कारण ही भरती परीक्षा प्रक्रिया या पोर्टल द्वारे परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका दिली जात नाही तसेच या महा परीक्षेसाठी शासन पाचशे व हजार रुपयाचे चलन प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागतो. बेरोजगार तरुणांसाठी ही बाब अन्यायकारक आहे  कारण विद्यार्थी वर्ग हा बेरोजगार आहे.

अशा परिस्थितीचा गंभीर विचार करून ही परीक्षा महापरीक्षा पोर्टल द्वारे न  घेता जुन्या ऑफलाइन पद्धतीने घ्याव्यात व  चलन पाचशे ते हजार रुपयाचे आकारले जाते ते घेऊ नये तसेच शासनाने पोलीस भरतीच्या व इतर विभागात  असलेल्या रिक्त जागा  भरण्यासाठी भरतीत वाढ करण्यात यावी,  असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी पदवीधर युवकांच्या भावना शासनाच्या या निर्णयाविषयी अतिशय तीव्र होत्या . त्यांनी शासनाच्या या महपरिक्षा पोर्टल च्या पारदर्शकतेवर अनेक शंका उपस्थित केल्या.या निवेदनावर पदवीधर युवक दिपक आव्हाड मुकेश चौधरी महेश चौधरी सिद्धार्थ मोरे सह शेकडो तरूणांच्या सह्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.