पारोळ्यात ‘श्रीं’चे विसर्जन ‘उत्साहात !

0

पारोळा (प्रतिनिधी) :  गणपती बाप्पा मोऱ्या …. पुढल्या वर्षी लवकर या … च्या जय घोषात ढोल ताश्याच्या गजरात बॅन्डच्या तालावर रात्री १ वाजता महाविर नगरच्या मागील बाजूस असलेल्या खदानीत सार्वजनिक गणेश मंडळानी गणरायाला मोठया भक्ती भावाने निरोप दिला अर्थात विसर्जन केले.

दिनांक 12 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यासाठी जवळपास सकाळपासूनच घरगुती गणपतीचे विसर्जन सुरू झाले होते.  ठिकठिकाणी  बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी घरघुती गणरायाच्या विसर्जना साठी पॉईड ठेवलेले होते अनेकांनी बाप्पाचे विसर्जन तेथे केले.

सार्वजनिक मंडळाच्या मिरवणूका ..

सायंकाळी ६ वाजता नगर पालिका चौक गांवहोळी चौक रथ चौक गणपती चौक बहिरम गल्ली त्रिमूर्ती चौक गुजराथी गल्ली तुन नगर पालिका वरून बाजारपेठ मागेॅ  शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ मिरवणूका विसर्जित करून पुढे महामार्गा वरून महावीर नगर येथील खदाणीत मोठ्या उत्साहात गणरायाचे विसर्जन करण्यात आले .  या वेळी नगर पालिका कर्मचारी गणेश मंडळ , सार्वजनिक गणेश मंडळ , कीर्ती गणेश मंडळ , आदर्श गणेश मंडळ , बालाजी स्वयंसेवक गणेश मंडळ , श्रीराम गणेश मंडळ , शिवाजी गणेश मंडळ , न्यू दोस्त गणेश मंडळ , वन मॅन शो गणेश मंडळ यांच्या सह  शहरातील अनेक लहान मोठे गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.

महावीर नगरच्या खदाणीत विसर्जन……

शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपतीचे विसर्जन महावीर नगर ला लागून असलेल्या मोठ्या खदाणीत करण्यात आले. यंदा पावसाळा चांगला असल्याने ही खदाण पाण्याने तुडुंब भरली होती . या मुळे या ठिकाणी नगरपालिका  प्रशासनाच्या वतीने  विसर्जन साठी जय्यत तयारी केली होती .  या ठिकाणी चौफेर कढळे बांधून लाईटची हि  व्यवस्था करण्यात आली होती . मंडळाच्या  एक एक गणपतीचे विसर्जन होत होते .न . पा कर्मचारी तरफ्यावर  गणपती बाप्पाला ठेवून पाण्याच्या मध्यभागी जाऊन श्री चे विसर्जन करीत होते.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणून गणरायाला मोठया भक्ती भावाने निरोप देतांना अनेक गणेश भक्तांचे डोळे पानवले होते.

महावितरणची चोख व्यवस्था ..

शहरात महावितरण कडून कुठेही वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून चोख  व्यवस्था ठेवली होती.

पोलीस प्रशासना कडून चोख बंदोबस्त—-

पारोळा पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी आपल्या कमॅचायाॅन सोबत स्वता उपस्थिती राहुन चोख बंदोबस्त ठेवला. त्या साठी कर्मचारी सर्व मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या सहकार्याने मिरवणुका उत्साहात व आनंदात पार पडल्या .

Leave A Reply

Your email address will not be published.