जळगाव स्थानकावर राजधानी एक्स्प्रेसचे स्वागत : सरकत्या जिन्यांचे उद्घाटन

0

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रेल्वेस्थानकावर राजधानी एक्स्प्रेसला थांबा मिळाल्याने आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रेल्वेचे स्वागत करण्यात आले. तसेच जेष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी दोन सरकते जिण्याचे ही उदघाटन करण्यात आले.

यावेळी खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेष पाटील, आ. चंदूभाई पटेल , महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जिल्हापरिषद सदस्य पोपटतात्या भोळे  डीआरएम अरुण कुमार पांडे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, नगरसेवक किशोर बाविस्कर,  तन सनकत, सरिता नेरकर व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी खासदार रक्षाताई खडसे म्हणाल्या कि , जळगाव स्थानकावर राजधानी एक्स्प्रेस हि आठवड्यातून दोन वेळा थांबत असल्याने आता चार वेळा ती थांबणार आहे . तसेच नागरिकांकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर ती आठवड्याभरसाठी सुरु केली जाईल.तसेच रेल्वे विभागाकडून सर्वच स्टेशन डिजिटल केले जात आहे.त्यात लिफ्टची व्यवस्था ,वायफाय ,पाण्याची व्यवस्था तसेच शौचालय यासर्वच बाबी  रेल्वे विभागाकडून मिळत असल्याने त्यांच्याकडून एकप्रकारे  चांगली कामे होत असल्याने  त्यांचे सहकार्य मिळत असल्याचे ही आभार यावेळी खा. रक्षा खडसेंनी मानले. यावेळी दोन सरकत्या जिन्यांचे ही रक्षा खडसे व खा. उन्मेष भैय्या पाटील यांच्या हस्ते नारियल फोडून उदघाटन करण्यात आले. याशिवाय स्वच्छ भारत अभियानांतर्गत खासदार रक्षाताई खडसे आणि खासदार उन्मेष पाटील यांनी रेल्वेस्थानकावर झाडू लावून साफसफाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.