खासगी ट्रॅव्हल बस लुटीचा कट उधळला

0

बाजारपेठ पोलिसांची कामगिरी, दोन तलवारी व गावठी कट्ट्यासह तिघांना अटक, दोघे फरार

भुसावळ दि . 2 –
राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणा-या खासगी ट्रॅव्हल बस लुटण्याच्या तयारीत असणा-या टोळीचे कटकारस्थान बाजारपेठ पोलिसांनी उधळून लावीत यातील तिघांना दोन तलवारीसह ताब्यात घेतले तर दोघे आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी घटना येथे शुक्रवारी रात्री घडली.
राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरकडून येणा-या खाजगी हातात तलवारी, गावठी कट्टा घेऊन लुटण्याच्याा बेतात काही तरुण लुटारूंची टोळी असल्याची कुणकूण बाजारपेठ पोलिसांना लागलेली होती. ही टोळी नहाटा कॉलेजच्या पुढे पाण्याच्या टाकी जवळ लपून बसले असून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त खात्रीलायक माहिती 2 फेब्रुवारी रोजी रात्री पेट्रोलिंग करतांना बाजारपेठ चे निरीक्षक देविदास पवार यांना मिळाली , पो नि देविदास पवार यांनी खात्री करून आपले सहकारी ए.एस.आय. तस्लिम पठाण,हे.कॉ.माणिक सपकाळे, संजय भदाणे,प्रशांत चव्हाण, कृष्णा देशमुख, योगेश माळी, गजानन वाघ,बापूराव बडगुजर, गुलबक्श तडवी,जितेंद्र सांळूखे, संदिप परदेशी,सुनील थोरात, सुनील जोशी,विनोद विटकर त्या ठिकाणी सापळा रचला व लपून बसलेल्या लुटारू टोळीला पकडले . त्यांच्या जवळून दोन तलवारी,गावठी कट्टा व आढळून आले .
या टोळीमध्ये आरोपी कलिम शेख सलिम, सुरेश राजू पवार उर्फे टकल्या,संदीप बुधा खंडारे, शुभम धनंजय साबळे, गोल्या शेख शरीफ (सर्व राहणार दीनदयाल नगर,भुसावळ) यांचा समावेश आहे .यातील सुरेश पवार उर्फ टकल्या (25, दीनदयाल नगर, भुसावळ), शुभम धनराज साबळे (19, दीनदयाल नगर) व संदीप बुधा खंडारे (इंदिरा भुसावळ) यांना दोन तलवारीसह अटक केली तर टोळीचा म्होरक्या कलीम शेख सलीम (दीनदयाल नगर, भुसावळ) व गोल्या शेख शरीफ (दीनदयाल नगर, भुसावळ) हे दोघे मात्र फरार होण्यात यशस्वी झाले .या पो.कॉ. योगेश वामदेव माळी यांनी फिर्याद दिली यावरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 399,402,34, 25(3),25(4) प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आहे . तपास उपनिरीक्षक निशीकांत जोशी करीत आहेत. दरम्यान, आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.