अस्वलाचे जबडे व मागील दोन पाय जप्त

0

धनंजय पवार यांच्या गस्तीपथकाची कारवाई
आजरोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन उपवनसंरक्षक, जळगांव वनविभाग, जळगांव श्री. दिगंबर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीपथक, जळगांव व मध्यप्रदेश अधिकारी व कर्मचारी यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील धाबेपिंप्री गावाजवळील पाड्यावर आज सकाळी धाड टाकली. याठिकाणी नवलसिंग छत्तरसिंग पावरा, रा. धाबेपिंप्री याच्याकडे अस्वलाचे जबडे, मागील दोन पाय कापुन लपवुन ठेवलेले आढळुन आले. ही शिकार त्यांनी धरणगांव (मध्यप्रदेश) या गाव शिवारात 26 जानेवारी, 2019 रोजी केल्याचे कबुल केले. त्यांना मध्यप्रदेश वनविभागाने ताब्यात वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल केला.
या कारवाईत श्री. धनंजय पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्तीपथक जळगांव, श्री. आर. एस. रोध वनक्षेत्रपाल (मध्यप्रदेश), जी. नरगेश, वनक्षेत्रपाल (मध्यप्रदेश), श्री. आर. एच. ठाकरे, वनपाल, श्री. जी. डी. गवळी, श्री. डी. जी. पाटील, श्री. सी. व्ही. पाटील (सर्व वनरक्षक), श्री. पि. यु. कोळी या कर्मचार्‍यांनी या मोहीमेत सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.