जामनेरात आशा दिवस मोठ्या उत्साहात साजरा

0

जामनेर, दि.3.-
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने येथील पंचायत समितीच्या सभागृहात काल दि.3 रोजी आशा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट माता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे,जिल्हा परिषदेच्या बांधकाम व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी चव्हाण,जिल्हा परिषद सदस्या विद्या खोडपे,प्रमिला पाटील, अमित देशमुख,पंचायत समितीच्या सभापती रूपाली पाटील,गटनेते अमर पाटील,रमण चौधरी, जलाल तडवी,निता पाटील,कमलाकर पाटील, गटविकास अधिकारी अजय प्रकल्प अधिकारी ईश्वर गोयर,कक्ष अधिकारी के.बी. पाटील आदि उपस्थित होते.यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष नवलसिंग पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आशा दिनाचे औचित्य साधून राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री ना.गिरीष महाजन यांच्यावतीने तालुक्यातील आशा स्वयंसेविकांना सप्रेम भेट म्हणून प्रत्येकी एक साडी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. कार्य केलेल्या गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास बशीर पिंजारी,सुधाकर माळी,दिपक सुर्यवंशी,मंगला दायमा,ज्योती पाटील,सुनयना चव्हाण,शिवानी देशमुख,रेखा तायडे,संगिता पाटील यांच्यासह गट प्रवर्तक,आशा स्वयंसेविका व आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.पल्लवी सोनवणे, सुत्रसंचलन तालुका आरोग्य डॉ.राजेश सोनवणे तर आभार प्रदर्शन ज्योती पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.