नली या एकल नाट्याने परिवर्तन महोत्सवास सुरुवात

0

नाटय अभिवाचनाने आज सांगता

जळगाव दि. 3-
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण स्मृतिप्रित्यर्थ आयोजित परिवर्तन महोत्सवास हर्षल पाटील यांनी सादर केलेल्या नली या एकल नाट्याने रविवारी एसएमआयटी महाविद्यालयात रविवारी सुरुवात झाली. तत्पूर्वी मान्यवरांनी पारंपारीक तालवाद्ये वाजवून महोत्सवाचे उदघाटन केले. यावेळी आ. सुरेश भोळे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. रविंद्रभैय्या पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, संगिता राजे निंबाळकर, प्रा. एन. डी. पाटील, अपर्णा भट कासार, नगरसेविका ज्योती चव्हाण, नगरसेवक मयूर कापसे, सुनिल पाटील, गजानन देशमुख, संदेश भोईटेल काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, ज्ञानेश्वरमोरे, दुर्गेश पाटील आदींची उपस्थिती होती. रविवारी अभंग ते लावणीचा पाचशे वर्षांचा इतिहास परिवर्तनच्या कलावंतांनी उलगडून दाखविला. तर आज सोमवारी दोन नाटकांचे अभिवाचनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
शनिवारी सादर झालेल्या नली या एकल प्रयोगाने रसिकांची मने जिंकली. या एकल नाटकात कलावंत हर्षल पाटील यांनी तब्बल 18 व्यक्तिरेखा साकारल्या. नलीने रसकांना दोन तास खुर्चीवर खिळवून ठेवले. या नाटकाचे महाराष्ट्रभर 34 प्रयोग झाले आहेत. नाटकाची संकल्पना शंभू पाटील यांची होती. लेखन श्रीकांत देशमुख, दिग्दर्शन योगेश पाटील, नेपथ्य राहूल निंबाळकर, प्रकाश योजना मंगेश कुलकर्णी यांची होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजुषा भिडे यांनी केले. भूमिका महोत्सव प्रमुख अंजली पाटील यांनी मानली तर उपस्थितांचे आभार राहूल निंबाळकर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.