खामगाव न.पा. दिव्यांगासाठी राबवणार भाऊसाहेब फुंडकर व गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने योजना

0

विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये शिष्यवृत्ती, मुलींच्या लग्नासाठी रु.३००००

खामगाव : स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने खामगाव नगरपालिकेने भाऊसाहेब फुंडकर व गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने दिव्यांग विद्यार्थी व मुलींसाठी दोन वेगवेगळ्या योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती नगराध्यक्ष सौ अनिता डवरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

यात नमूद आहे की लोकनेते कृषिरत्न स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर दिव्यांग शक्ती योजनेअंतर्गत खामगाव शहर हद्दीतील रहिवासी दिव्यांग विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय खामगाव नगर पालिकेने घेतला आहे तसेच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे कन्यादान योजना अंतर्गत दिव्यांग मुलींच्या लग्नासाठी तीस हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे या दोन्ही योजना नगरपालिकेकडून आपल्या स्तरावर राबविण्यात येणार आहेत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2015 पत्र क्रमांक एकशे अठरा नवीन 20 दिनांक 28 ऑक्टोबर 2015 नुसार पाच टक्के निधी व रंगासाठी सदर शासन निर्णयातील नमूद 18 बाबींवर खर्च करण्याचा अधिकार नगरपालिकेला देण्यात आलेला आहे या अनुषंगाने खामगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा 13 जुलै 2020 रोजी पार पडली असता या सभे मध्ये आर्थिक वर्ष 2019 20 करता दिव्यांग शीर्षकाखाली शिल्लक रकमेचे नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यामध्ये मार्गदर्शक सूचना क्रमांक १ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना तर मार्गदर्शक सूचना क्रमांक १३ नुसार दिव्यांग मुलींच्या लग्नासाठी ३०००० मदतीची योजना सुरू करण्याचे ठरले. खामगाव नगरपालिकेच्या हद्दीतील शाळेत शिकणाऱ्या व नगरपालिका हद्दीतील रहिवाशी असलेल्या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लोकनेते कृषिरत्न स्व. भाऊसाहेब फुंडकर दिव्यशक्ती शिष्यवृत्ती योजना तसेच मुलींच्या लग्नासाठी लोकनेते स्व गोपीनाथ मुंडे कन्यादान योजना सुरू करण्याबाबत प्रस्ताव यावेळी बहुमताने पारित करण्यात आला, अशाप्रकारे दिव्यांगासाठी आपल्या स्तरावर योजना राबविणे खामगाव नगरपालिका ही केवळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात पहिली नगरपालिका असावी असे या पत्रात नमूद केले आहे.

नोंदणीकृत दिव्यांगांना दिला जातो बाराशे रुपये भत्ता.
नगर परिषदेची सर्वसाधारण सभा दिनांक 19 डिसेंबर 2017 चे ठराव क्रमांक २२ नुसार दिव्यांग व्यक्तींना दरवर्षी १२०० रुपये प्रमाणे पेन्शन तथा बेरोजगारी भत्ता देण्यात येत आहे. नगरपालिकेच्या रेकॉर्ड विभागात दिव्यांग रजिस्टरमध्ये नोंदणी करणाऱ्याना या योजनेचा लाभ दिला जातो. आतापर्यंत न.प हद्दीतील एकूण 634 दिव्यांग बांधवांनी नोंद केली आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये 472 लाभार्थ्यांना प्रत्येकी १२०० रुपये प्रमाणे बेरोजगारी भत्ता व इतर खर्च एक लाख 92 हजार असा एकूण ४ लाख 98 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती सुद्धा या पत्रकात देण्यात आली आहे.

दिव्यांगाना धान्य व किराणा कीटचे वाटप
मार्च अखेरीस सुरु झालेल्या लॉक डाऊन १ च्या काळात नगरपालिकेने शहरातील दिव्यांग बंधावाना अन्नधान्य व किरण मालाच्या एकूण 565 किटचे वाटप केले असल्याची माहिती सुद्धा नगराध्यक्ष सौ अनिता डवरे यांनी प्रसिद्धिपत्रकात केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.