यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा ; पो.नि.कानडे

0

पारोळा (प्रतिनिधी) : यंदाचा गणेशोत्सव हा कोरोना कोविड१९ या साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा, यासाठी मंडळांनी विशेष काळजी घेऊन, शासनाचे विविध नियम आदी विषयांची माहिती देण्यासाठी आज शहरातील विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष , पदाधिकाऱ्यांची बैठक पारोळा पोलीस स्टेशन मध्ये आयोजित करण्यात आली होती.

यावेळी पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी मार्गदर्शन केले, ते पुढे म्हणाले की, या वर्षी गणेशोत्सव कश्या पद्धतीने साजरा करता येईल त्या नुसार यंदाचा गणेशोत्सव ,सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मुर्तीची उंची ४ फुट पेक्षा जास्त असू नये,गणपती बसवतांना व विसर्जन मिरवणुकिला परवानगी नाही,मंडळांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, स्वच्छता मोहीम,कोरोना विषयी जनजागृती असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच डी जे अथवा बँड ला परवानगी नाही मंडळांनी आपल्या भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनासाठी फेस बुक पेज तयार करावे व भाविकांना ऑनलाइन दर्शनाचा लाभ द्यावा , तसेच भाविकांना मंडळ स्थळी सामाजिक अंतर, सॅनिटायझर ,मास्क आदी बाबींचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना दिल्या तर विसर्जनासाठी शक्यतो पाण्याचे कृत्रिम तलाव तयार करून त्यात मूर्त्यांचे विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले.

नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळ व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे शेवटी सांगितले बैठकीस शहरातील गणेश मंडळाचे विजय पाटील , रमेशकुमार जैन, रमेश मोरे, भूषण पाखले, चौधरी, यांच्या सह अनेक गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थीत होते. शेवटी पोलिस स्टेशन च्या वतीने गुप्त शाखेचे सुनिल पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले या वेळी पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.