खडसे कुटुंबीयांचा बैलपोळा सण साजरा

0

मुक्ताईनगर : कृषीप्रधान असलेल्या आपल्या महाराष्ट्रात बळीराजाचा महत्त्वाचा साथीदार असणार्‍या बैलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज पिठोरी अमावस्येला आपण बैलपोळा साजरा करतो. दरम्यान, या बैल पोळ्या निमित्त कोथळी येथे आज आपल्या निवासस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बैलजोडीची पुजा करून, त्यांना नैवद्य खावू घातला.  खान्देशात पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे पोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्यामुळे खडसे यांनी देखील दरवर्षाप्रमाणे यंदा बैलाची पुजा करुन हा सण साध्या पद्धतीने केला.

याप्रसंगी माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे, खासदार रक्षाताई खडसे, महाराष्ट्र दूध संघ महानंदा अध्यक्षा सौ.मंदाताई एकनाथराव खडसे, जेडीसीसी बँक चेअरमन सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर व कुटुंबीय उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.