खडसेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; जयंत पाटलांचं ‘ते’ ट्विट केलं रिट्विट

0

मुंबई – भाजपामधील नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मीडियाच्या माध्यमातून दिलेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका केली होती. एकनाथ खडसे यांनी हे ट्विट रिट्विट करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. यामुळे पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

 

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला, असे जयंतकरून  पाटलांनी म्हटले होते. एकनाथ खडसे यांनी हे ट्विट रिट्विट करून पहिल्यांदाच भाजपविरोधी भूमिका घेतली होती. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रमुख नेते खडसे राष्ट्रवादीत जाणार नाहीत, असे सांगत होते. मात्र, आता खडसे यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर भाजपचे नेते कशाप्रकारे व्यक्त होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान,एकनाथ खडसे भाजपातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी २२ ऑक्टोबर रोजीचा मुहूर्तही ठरला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

खडसेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुक्ताईनगरात कालपासून तयारीला सुरुवातही झाली होती. एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरवरुन कमळ गायब केलं आहे. खडसेंच्या मुक्ताईनगरात समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. “नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण” असे बॅनर समर्थकांनी झळकावले आहेत. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्यासाठी आपल्या गाड्यांवरती स्टिकर्स लावले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.