भडगाव येथे वाळू डंपर, ट्रॅक्टर जेसीपीवर महसूल विभागाची मोठी कार्यवाही

0

भडगाव (प्रतिनिधी) : शहरातील पाचोरा रोड येथे सकाळी ७ वाजता दादाजी धब्याच्या पाठीमागे वाळू साठवलेल्या थप्प्यावरून जेसीबीच्या साहाय्याने डंपर व ट्रॅक्तर मध्ये वाळू भरतांना महसूल विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

यात डंपर (क्र.  एम. एच १९ सी वाय ५४२६) टाटा कंपनीची हायवा डपंर व जेसीबी क्र एम एच १९ सि जे ०९४४ पिवळ्या रंगाचे जेसीबी व  निळे सोनाली कंपनीचे विना क्रमांक चेसेस क्रमांक बी झेड व्ही एस जी ७०२६४९एस३  हे ट्रॅक्टर वर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कार्यवाही  पाचोरा भडगाव महसूल विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे केलेली असून यात भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे, वाहन चालक विष्णू तायडे, पाचोरा तलाठी कैलास बहीर, आर.डी. पाटील, मयुर आगरकर, दीपक दवंगे यांचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.