खंडणी मागितल्याप्रकरणी राकेश निकम विरुद्ध गुन्हा दाखल।

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : वाईनशॉप मालकाकडून खंडणीची मागणी केली म्हणून राकेश निकम या इसमाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेली माहिती अशी की,भडगावरोड वरील ओरिजनल बियर आणि वाईन शॉप या दुकानात येवून राकेश निकम याने 10 रोजी दुपारी सडे चार वाजता बियर शॉपचा चोरून काढलेला एक मिनिट पन्नास सेकंदाचा व्हिडिओ दुकान मालक उदय पवार यांच्या व्हॉट्स अप मोबाईल क्रमांकावर टाकला. हा प्रकार पैसे उकळण्याचा त्याचा हेतू असल्याने दुकान मालक पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर राकेश निकम याने भ्रमणध्वनी वरून पवार यांना विचारले की,तुमच्याकडे बियर व वाईन शॉपचे लायसन्स असल्यामुळे तुम्हाला रम किंवा विस्की विकण्याचा कुठलाही अधिकार नाही.असे असतांना तुम्ही 70 लाखाचे 5 कोटी रुपये केले यावर तुमचे म्हणणे काय ? अशी विचारणा केली.याकडेही पवार यांनी दुर्लक्ष केले म्हणून त्याने पुन्हा 10 रोजी रात्री साडे दहा वाजता बंद दुकानाचे फोटो काढले व भ्रमणध्वनी वरून तुमची दारू बंदी विभागाकडे तक्रार करून चौकशीचा ससेमिरा लावतो असे सांगून त्याने पैश्याची मागणी केली. दुकान मालक उदय पवार यांनी 11 रोजी शहर पोलीसात त्याचेविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून राकेश निकम याचे विरुद्ध कलम 384, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे करीत आहे.

चाळीसगाव शहरात लॉक डाऊन च्या काळात बिनधास्तपणे देशी-विदेशी प्रकाराची दारू लोकप्रतिनिधीच्या आशिर्वादाने बिनधास्तपणे विकणाऱ्या या ओरिजनल वाईन शॉप, भडगाव रोड या दुकानावर ही एक्साईज विभागाने सखोल चौकशी करून कारवाई करावी अशीही सामान्य जनतेमधून मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.