भुसावळ बाजारपेठचे बाजीगर पोलीसांची कोरोनावर मात

0

अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी फुलांची उधळण करुन केले स्वागत 
भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ बाजारपेठच्या बाजीगर पोलीसांनी कोरोनावर मात करून स्वगृही सुखरूप परतल्याने येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी फुलांची उधळण करुन त्यांचे जंगी स्वागत केले. येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील बारा पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्य असताना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी जळगाव येथे रहिवास असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर ११ पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु होते . गुरुवार रोजी या पोलिसांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रेल्वे रुग्णालयातील कोविड सेंटरमधुन सुट्टी देण्यात आली आहे. सहकारी पोलीस कर्मचारी सुखरूप घरी परतल्याचा आंनद व्यक्त करीत या कर्मचाऱ्यांवर फुलाची उधळण करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

कोरोनाशी लढा देत असतांना अहोरात्र कर्तव्य बजावत असणाऱ्या भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना रेल्वे रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर केलेल्या तपासणीत अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आपले सहकारी सुखरूप घरी परतल्याचा आनंद सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून पुष्पगुच्छ देऊन व्यक्त करीत कर्मचाऱ्याचे जंगी स्वागत केले. प्रसंगी अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसून आले.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांच्यासह शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.