कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या भडगाव तालुका युवती अध्यक्षपदी प्रगती पाटील

0

भातखंडे (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या गिरड येथील रहिवाशी प्रगतिशील शेतकरी शांताराम आनंदा पाटील यांची कन्या तर गजानन आनंदा पाटील माध्यमिक शिक्षक अंतुर्ली बु. तालुका पाचोरा यांची पुतणी कु. प्रगती शांताराम पाटील या युवतीची कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या भडगाव तालुका युवती अध्यक्ष पदी आज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप दादा ननावरे यांच्या आदेशाने तसेच कार्याध्यक्ष प्रविण आजबे, संघटक श्रीकांत राजपूत, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कंक, युवती प्रदेशाध्यक्षा रोशनी जैद यांच्या मार्गदर्शनाने प्रगती शांताराम पाटील यांची निवड करण्यात आली.

भडगाव तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून कृषी पदवीधर, विद्यार्थी, युवती आणि शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून याकामी संपूर्ण संघटना आपल्या पाठीशी संघटना आपल्या पाठीशी राहणार आहे.तिची ही निवड जळगाव जिल्हा युवती अध्यक्षा कोमल अविनाश पाटील यांनी केली आहे तिच्या ह्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.