ईमारतीवरून पडल्याने ३१ वर्षीय कामगाराचा मृत्यू

0

जामनेर (प्रतिनिधी): – शहरातील शिवाजी नगर जवळ एका दवाखान्याचे बांधकाम करीत असतांना जुबेरखान कदीरखान (वय ३१ रा पिंप्राळाहुडको जळगांव) हा कारागीर ईमारतीच्या तीसऱ्या मजल्यावरून जमीनीवर पडल्याने जागीच ठार झाला. घटना सकाळी साडेनऊ-दहाच्या दरम्यान घडल्याचे पोलीस सुत्रांनी सांगीतले. नव्यानेच बांधकामास सुरूवात झालेल्या या खाजगी दवाखान्याच्या तीसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरू असुन,कोणतेही सुरक्षा उपकरणांची उपलब्धता संबंधीत मालकाद्वारे केली गेली नसल्याने उंचावर बांधकाम करतांना जळगावच्या बांधकाम कारागिराला नाहक आपला जिव गमवावा लागल्याचे कामगार वर्गाकडुन बोलले जात आहे.तरी मयताच्या कुटुंबीयांना सबंधीत ईमारत मालकाकडुन पुरेपुर आर्थीक मदत मिळावी अशिही मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.