शेंदुर्णी उद्यापासून पाच दिवस जनता कर्फ्यू

0

शेंदुर्णी (प्रतिनिधी) : सर्वत्र करण्याचा प्रादुर्भाव बघता अद्यापपर्यंत शेंदुर्णी मध्ये एकही पेशंट सापडला नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शेंदुर्णीमध्ये शनिवार ते बुधवार जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय येथील नगरपंचायत मध्ये झालेल्या व्यापारी आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.यावेळी मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सपोनि. राकेशसिंग परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या जनता कर्फ्यू मध्ये शेतीपूरक कृषी बियाणांची दुकाने, दूध सोसायटी, मेडिकल आणि दवाखाने सुरू राहणार असून सामाजिक पतसंस्था देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व पक्षीय बैठकीत उपनगराध्यक्षा पती गोविंद अग्रवाल नगराध्यक्ष पतीअमृत खलसे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंडीत जोहरे, मनसे नेते डॉ. विजयानंद कुलकर्णी, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, विरोधी पक्ष गटनेता पती योगेश गुजर, व्यापारी संघटना अध्यक्ष तजय अग्रवाल, गिरीश कुलकर्णी, राजेश कोटेच्या, फारुक शेख, मनोज झंवर, योगेश लुनिया, धीरज जैन, अकिल काझी राष्ट्रवादी शहराध्यक्ष रवींद्र गुजर, शिवसेना शहराध्यक्ष संजय सूर्यवंशी, गजानन धनगर, सत्ताधारी नगरसेवक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार! -मुख्याधिकारी

नागरिकांचे हित बघता नगरपंचायत च्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने शासनातर्फे देण्यात आलेल्या आदेशाचे पालन काटेकोरपणे करण्यात येत असून त्याचाच परिणाम ही शेंदुर्णी मध्ये एकही करण्याचा रुग्ण आढळून आलेला नाही. असे असले तरी वारंवार तक्रारी येत असून यापुढे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.