क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील यांचे निधन

0

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क  

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे आज गुरुवारी निधन झाले आहे. हाैसाताई पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून मृत्यूसमई त्या ९६ वर्षाच्या होत्या. हौसाताई पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. हौसाताईंच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने त्यांची कन्या हौसाताई पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य संघर्षात घालवले. स्वातंत्र्यांच्या पूर्वकाळापासून ते स्वातंत्र्यानंतरही जनतेच्या प्रश्‍नासाठी आंदोलने, मोर्चे काढून त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला. हौसाताई पाटील यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलने करून भारतातून त्यांना हाकलून देण्याचे बहुमोल कार्य केले. त्या हैदराबाद मुक्‍ती लढा, संयुक्‍त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्‍ती संग्रामात सहभागी होत्या. ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी आणि प्रतिसरकारला मदत करण्यासाठी अनेक मोहिमा त्यांनी काढल्या आहेत. गोव्यातून शस्त्रे आणून ती प्रतिसरकारला पुरवली आणि प्रतिसरकारची स्वातंत्र्यलढ्याची तीव्रता तेवत ठेवली.

वडील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर तसेच जी. डी. बापू लाड, नागनाथ नायकवडी आदी सहकाऱ्यांबरोबर अन्यायाविरुद्ध आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आंदोलने, मोर्चे काढून ब्रिटिश सरकारला जेरीस आणले.

Leave A Reply

Your email address will not be published.