युवासेनेच्या शीतल देवरुखकर-शेठ दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

युवासेना कोअर कमिटी सदस्य व मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या सौ.शीतल ताई देवरुखकर- शेठ दोन दिवसाच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून शुक्रवार व शनिवारी जळगावात असणार आहे.

युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्र स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन युवासेना व शिवसेनेतर्फे रायसोनी महाविद्यालय, शिरसोली रोड जळगाव येथे करण्यात आले असून स्पर्धेचे उदघाटन व बक्षिक वितरण समारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे मुलं व मुलींचे १० संघ सहभागी होणार असून स्पर्धेला जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सहकार्य लाभणार आहे.

या वेळी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लड्ढा , उपमहापौर कुलभूषण पाटील, शोभा चौधरी, युवासेना विस्तारक अजिंक्य चुंभळे, धनश्री कोळगे, रायसोनी महाविद्यालयाचे प्रीतम रायसोनी, डॉक्टर प्रीती अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, शिवसैनिक विराज कावडीया, अमित जगताप, स्वप्नील परदेशी, प्रीतम शिंदे, पियुष हसवाल, भूषण सोनवणे, संस्कृती नेवे, नेहल मोडक, सयाजी जाधव, दिनेश पाटील, इत्यादी परिश्रम घेत आहे. दोन दिवसाच्या दौऱ्यात युवासेनेच्या पदाधिकारी व युवसैनिकांशी शीतल शेठ संघटन वाढी, विद्यापीठ कारभार विषयी चर्चा करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.