कोरोना : जळगाव जिल्हा बंदी आदेश जारी

0

जळगाव :- सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील 14 मार्च, 2020 च्या पत्रानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे. कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्याने कोरोना विषाणुच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 च्या तरतुदीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची वाहतूक करणारी वाहने यांना जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्ह्यातून निर्गमन करण्यास प्रतिबंध करण्यात येतअसल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज जारी केले आहे.

फौजदारी प्रक्रीया 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यातील सर्व सिमा तात्काळ बंद करण्यात  येत आहे. पोलीस अधिक्षक, जळगाव व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी संयुक्तरित्या जिल्हातील सर्व सिमावर्ती ठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करून त्यांना प्रवेश व निर्गमन करण्यास प्रतिबंध करावा. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही नागरिकास जिल्ह्याबाहेर जाण्यास  किंवा बाहेरिल जिल्ह्यतील नागरिकास जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.

जिल्हा बंदी आदेशातून शासकीय, निमशासकीय, ॲम्ब्युलन्स, अग्निशमन वाहने, अत्यावश्यक व जिवनावश्यक वस्तू, सेवा, मनुष्यबळ, पुरविणारी वाहने व वाहतूक व्यवस्था, उदा. पिण्याचे पाणी, दुध, फळे, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे, टेलीफोन व इंटरनेटची सेवा, हॉस्पिटलसाठी आवश्यक असणारे साधन सामुग्री, प्रसार माध्यमांची वाहने, विद्युत विभागाशी संबंधित उपकरणे, पेट्रोल, गॅस, डिझेल इत्यादिंना या बंदी आदेशातून वगळण्यात आल्याचेही डाॅ ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.