शहरात आजपासून नमाज घरीच होणार -मुफ़्ती अतिकउर रहेमान

0

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सर्व मशिदिचे चे प्रमुख व ट्रस्ट ची एक अत्यंत महत्त्वाची व तातडीची सभा शहर ए काजी मुफ़्ती अतिकउर रहेमान यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यात असे ठरले की मंगळवारपासून प्रत्येके नमाज अजान झाल्यावर पाच मिनिटात जमात उभी राहील त्यात फक्त चार ते पाच नमाजी यांच्या उपस्थितीत नमाज अदा केली जाईल बाकी सर्वांसाठी नमाज आप आपल्या घरी करण्याचे आदेश (फतवा) मुफ़्ती अतीकुर्रहमान यांनी काढलेला आहे
त्याचप्रमाणे जुमा ची नमाज ही सुद्धा अशाच प्रकारे होणार असून त्यात फक्त अरबी खुदबा होईल व त्यात सुद्धा नमाजी ची संख्या अत्यंत कमी राहील त्यामुळे जोपर्यंत हा कोरोना व्हायरस संपत नाही व प्रशासन संचारबंदी उठवत नाही तोपर्यंत याच पद्धतीने नमाज अदा करण्यात यावी तसेच प्रत्येक विश्वस्तांनी आपल्या मशिदीची तसेच आपल्या परिसरातील स्वच्छते बाबत पुरेपूर लक्ष द्यावे असे ठरले.

कोरोना व्हायरस ची साथ चालू असल्याने व प्रशासनाने संचारबंदी लावली गेल्याने सर्व तरुणांनी व इतर लोकांनी कोठेही चार व्यक्तीपेक्षा जाता कामा नये, फिरता कामा नये असे आव्हान सुद्धा करण्यात आले.

या मिटींगमध्ये अक्सा मस्जिद चे मौलाना सालिक सलमान, सालार नगरचे मौलाना मोहम्मद जुबेर, मासूम वाडीचे मौलाना हाफिज रहमान, शाहूनगर मधील मौलाना अख्तर नदवी, सुप्रीम कॉलनी चे हाफिज तलहा, मेमन बिरादरीचे बशीर बुरहानी, मौलाना मोहम्मद जुना मेहरून चे ईकबाल पिरजादे मोहम्मद ,रफीक सय्यद, हरुण सय्यद , तहजीब उलमा चे अध्यक्ष काझी मुजम्मिल, जामा मशिदीचे सैयद चाँद व जुना मेहरूनचे पिरजादे व सय्यद इस्लामपूर चे सय्यद शाहिद, शाहूनगर चे खलील अहमद व खान शकील ,मौलाना अब्दुल रहमान यासह गफ्फार मलिक ,फारुक शेख व करीम सालार यांची विशेष उपस्थिती होती.

तसेच मोहम्मद रफीक पटनी, नफीस मोहम्मद, अजिज पटेल, निजामुद्दीन शेख, सय्यद हारून, सय्यद फारूक ,कमृद्दिन पीरज़ादा, कलिमुद्दिन मोहम्मद, फिरोज खान, जुबेर खान, शकील अहमद व महमूद शेख आदी उपस्थित होते सभेच्या सुरुवातीला ला प्रथम उपस्थित सर्वांनी आपले हात सैनीटायज़र ने स्वच्छ केले तसेच मशिदीत आपल्या मास्क व सैनी टायज़र हे ट्रस्ट च्या वतीने देण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले.
तसेच मुस्लिम समाजा तर्फे सैनी टायझिंग, साबण व मास्क सुद्धा शहरातील वस्तीमध्ये देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.